नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी भारतच्या घोषणेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकूण २० लाख कोटींच्या पॅकेजची माहिती दिली होती. आज याच पॅकेजवरून आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी दास यांनी पत्रकार परिषद घेऊन नोकरदारांना दिलासा दिला होता. तीन महिने ईएमआयन देण्याची मुभा दिली होती. लॉकडाऊनमध्ये कोणाचा रोजगार बुडाला किंवा नोकरी गेली तर तो व्यक्ती घेतलेल्या कर्जाचा ईएमएय भरू शकत नव्हता. यामुळे अशा व्यक्तीला दंड आणि क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर बँकांनीही या सूचनेचे पालन केले होते.
याआधी आरबीआयचे एक संचालक आणि आरएसएसशी संबंधित सतीश काशीनाथ मराठे यांनी मोदी सरकारच्या पॅकेजवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सांगितले की, तीन महिन्यांचा मोरेटोरियम पुरेसा नाही. तसेच एनपीएमधील सूट ही या पॅकेजमध्ये असायला हवी होती. जेणेकरून भारत पुन्हा विकासाच्या रस्त्यावर आला असता.
गेल्या १७ एप्रिलला कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आरबीआयने विविध योजनांची घोषणा केली होती. यावेळी रिव्हर्स रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. आता हा रेपो रेट ४ टक्क्यांवरून ३.७५ टक्के झाला आहे. त्या आधी २७ मार्चला दास यांनी मुदतीच्या कर्जांवर ईएमआय न भरण्याची सूट दिली होती. याचा फायदा गरजुंना झाला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथ
CoronaVirus नवरी नटली, सुपारी फुटली! नववधू पॉझिटिव्ह आली; अख्खी वरात क्वारंटाईन झाली
सात सीटर Renault Triber AMT लाँच; जाणून घ्या किंमत
CoronaVirus 'बदनाम' भांग उतरवणार कोरोनाची झिंग; वाढ रोखण्यावर 'या' देशात संशोधन
चीन पुन्हा जगाला हादरवणार; 'नव्या' दीर्घायुषी कोरोनाचे वागणे आणखी खतरनाक