नवी दिल्ली- शीख समुदायाचे दहावे गुरू. गुरू गोविंद सिंह यांच्या 350 व्या जयंतीच्या दिवशी सरकार 350 रुपयांचा स्मृती शिक्का जारी करणार आहे. 350 रुपयांचं नाणं बनविणार असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलं आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतून ही माहिती देण्यात आली आहे. 'श्री गुरू गोविंद सिंह यांच्या 350 व्या जयंतीनिमित्याने केंद्र सरकारच्या परवानगीने 350 रुपयांचं नाणं बनविलं जाणार असल्याचं अधिसूचनेत म्हंटलं आहे.
कसं असेल नाणं?350 रुपयांच्या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल. यामध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांब आणि पाच-पाच टक्के निकेल आणि जस्त असेल. नाण्याच्या सुरूवातीच्या भागावर रुपयाचं चिन्ह आणि अशोक स्तंभाच्या खाली आंतरराष्ट्रीय नंबरमध्ये 350 कोरलं असेल. नाण्याच्या मागील बाजूस 'तख्त श्री हरमंदिर पटना साहिब' यांचा फोटो असेल. नाण्याच्या उजवी-डावीकडे एका बाजूला 1666 आणि दुसऱ्या बाजूला 2016 कोरलं असेल.