शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

RBI Vs Government : 'बऱ्याच वाईट बातम्या येतील, 'सेक्शन 7' अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचं' - चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 11:04 AM

RBI Vs Government : केंद्र सरकार व भारतीय रिझर्व्ह बँकेमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यादरम्यानच, सरकारकडून आरबीआय अँक्टअंतर्गत 'सेक्शन 7' लागू करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

नवी दिल्ली -  केंद्र सरकार व भारतीय रिझर्व्ह बँकेमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यादरम्यानच, सरकारकडून आरबीआय अँक्टअंतर्गत 'सेक्शन 7 ' लागू करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अहवालाचा हवाला देत यासंदर्भात ट्विट करत भीती व्यक्त केली आहे. 'जर सरकारकडून सेक्शन 7 लागू करण्यात आले असल्यास, आज बऱ्याच वाईट बातम्या येऊ शकतात', असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे. 

(बँकांच्या कामकाजातील ढवळाढवळ बंद करा, अन्यथा... RBIच्या कर्मचारी युनियनचा केंद्राला इशारा)

पी. चिंदबरम यांनी आरबीआय आणि केंद्र सरकारमधील तणावासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करणारे ट्विट केले. 

पी. चिंदबरम यांचे ट्विट :

''अहवालानुसार, केंद्र सरकारनं आरबीआय अॅक्टमधील सेक्शन 7 लागू केले आहे. या अंतर्गत सरकारकडून केंद्रीय बँकांना निर्देश पाठवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर,आज बऱ्याच वाईट बातम्या येऊ शकतात, याची मला भीती वाटत आहे. 

आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना चिंदबरम यांनी मोदी सरकारवर निशाणादेखील साधला आहे. ''1991, 1997, 2008 आणि 2013 या एकाही वर्षात आमच्याकडून सेक्शन 7 लागू करण्यात आले नव्हते. या तरतुदीची आता अंमलबजावणी करण्याची गरजच आहे?, यावरुन अर्थव्यवस्थेसंदर्भात सरकार काही तरी लपवत असल्याचं दिसून येत आहे'', असंही चिंदबरम यांनी म्हटले आहे.  काय आहे सेक्शन 7?भारतीय रिझर्व बँक अॅक्टमधील 'सेक्शन 7' द्वारे सरकारला एक विशेष अधिकार मिळतात. आरबीआय अॅक्ट अनुसार, या सेक्शन अंतर्गत सरकारकडून गर्व्हनरला कोणत्याही स्वरुपातील निर्देश दिले जाऊ शकतात. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी महत्त्वपूर्ण धोरण लागू करण्याची आवश्यकता वाटल्यास सरकार 'सेक्शन 7' लागू करू शकते.  प्रसार माध्यमांनुसार, सरकारकडून सेक्शन 7 लागू करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या माहितीनुसार, भारतात स्वातंत्र्यानंतर प्रथमच या अॅक्टची अंमलबजावणी करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. 

 

(बँका भरमसाट कर्ज वाटप करत असताना आरबीआयनं दुर्लक्ष केलं- अरुण जेटली)

दरम्यान,  नोटाबंदीसह रेपोदर वाढीसंदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी आजवर अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने बँकेच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये, असे मत बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनीही एका कार्यक्रमात व्यक्त केले होते. यानंतर केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेतील संबंध ताणले गेले. यामुळे ऊर्जित पटेल हे गव्हर्नरपदी कायम राहतील की नाही, अशी उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

नोटाबंदी, नीरव मोदी घोटाळा, रेपोदरातील वाढ, सरकारी बँकांमधील एनपीए, वाढती महागाई, घसरणारा रुपया, वित्त संस्थांमधील रोख तरलतेची समस्या या सर्व संकटांना रिझर्व्ह बँकच कारणीभूत असल्याचे केंद्र सरकारचे मत झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार-रिझर्व्ह बँक यांच्यातील संवाद मागील सहा महिन्यांपासून ठप्प झाला आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकP. Chidambaramपी. चिदंबरम