जम्मू : कटरा शहराजवळील त्रिकुटाच्या जंगलात भयंकर आग पसरली असून, तिच्यावर नियंत्रणासाठी सैन्य दलाची दोन हेलिकॉप्टर्स पाठविण्यात आली आहेत. याच डोंगर भागात वैष्णोदेवीचे मंदिर आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुजित कुमार यांनी सांगितले की, बाणगंगाजवळ कटरा शहराच्या डोंगर भागात जंगलात ही आग लागली. यात्रेकरूंची ने-आण करणाऱ्या हेलिकॉप्टर्सना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. हेलिकॉप्टर सेवा बंद असल्यामुळे यात्रेकरूंना अडचणी आल्या. बुधवारीही काही काळासाठी हेलिकॉप्टर सेवा बंद होती. अनेक ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्यानंतर हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.उत्तराखंडच्या जंगलात पुन्हा आग भडकली आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील या आगीने १८० हेक्टरपेक्षा अधिक जंगलाचा भाग घेरला आहे. जिल्ह्यातील १११ ठिकाणी ही आग लागली आहे, ती विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.फायर सीझन...हवामान खात्याच्या केंद्रातील संचालक विक्रम सिंह यांनी सांगितले की, ‘मागील एका आठवड्यापासून उत्तराखंड प्रचंड उन्हामुळे त्रस्त आहे. बहुतांश ठिकाणी तापमान सामान्यापेक्षा चार ते पाच डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. यावर्षी फेब्रुवारीत सुरू झालेल्या ‘फायर सीझन’मध्ये उत्तराखंडात १८५७ घटनांत ४०४८ हेक्टर जंगल नष्ट झाले आहे.’
काश्मीर, उत्तराखंडात पुन्हा पेटला वणवा
By admin | Published: May 19, 2016 4:28 AM