शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

देशाच्या कानाकोपऱ्यात उपाध्याय यांना पोहोचविणार

By admin | Published: August 22, 2016 4:28 AM

जनसंघाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार केंद्रातील भाजप सरकारने केला आहे.

नितीन अग्रवाल,

नवी दिल्ली- जनसंघाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार केंद्रातील भाजप सरकारने केला आहे. यासाठी एक खास योजना आखण्यात आली असून, देशातील ६८३ जागांवर दीनदयाल उपाध्याय यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. सामाजिक सभागृह आणि ग्रंथालयेही उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी या कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याचे समजते. काँग्रेसकडून फक्त नेहरू आणि गांधी कुटुंबाचे कौतुक होते, असा आरोप भाजपकडून नेहमीच होतो.मोदींच्या हस्ते प्रारंभ होणाऱ्या या योजनेसाठी केरळातील कालिकट हे ठिकाण निवडण्यात आले आहे. येथेच उपाध्याय यांना १९६७ मध्ये जनसंघाचे अध्यक्ष निवडण्यात आले. दीनदयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची घोषणा सरकारने यापूर्वीच केली आहे, तर केंद्रीय बजेटमध्ये यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून ८० टक्के स्मारक, सामाजिक सभागृह आणि ग्रंथालय उभारण्यात येतील. यासाठी राज्य सरकारांकडून प्रस्ताव मागविले आहेत. >कालिकटमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी?भाजपने आपल्या आगामी कार्यकारिणी बैठकीसाठी कालिकट हे ठिकाण निवडले आहे. २३ ते २५ सप्टेंबर या काळात होणाऱ्या बैठकीस २,५०० हून अधिक कार्यकर्ते हजर राहतील, असा अंदाज आहे. यावेळी मोदींच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणासाठी देशात ४,००० विधानसभा क्षेत्रात मोठे स्क्रीन लावण्याची योजना आहे.भाजपचे आरोप : भाजपने अनेकदा काँग्रेसवर आरोप केलेले आहेत की, नेहरू आणि गांधी कुटुंबांशिवाय अन्य दुसऱ्या नेत्यांची ओळख मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. श्यामा प्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, शिवाजी, मौलाना आझाद, भगतसिंह, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, विवेकानंद आणि महाराणा प्रताप यांचे डाक तिकीट जारी करण्याचा निर्णय घेताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले होते की, फक्त एकाच कुटुंबाला हा सन्मान मिळू शकत नाही.