हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काही महिन्यांपूर्वी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्य वक्तव्यावर तब्बल पाच महिन्यांनंतर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. नड्डांचे वक्तव्य ही कौटुंबिक बाब असून ती कौटुंबिक समस्येप्रमाणेच सोडवली जाईल, त्याची सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा केली जाणार नसल्याचे प्रतिपादन संघाचे संयुक्त सरचिटणीस सुनील आंबेकर यांनी बुधवारी केले. मात्र, भाजप व संघातील या कौटुंबिक वादाला अद्याप पूर्णविराम मिळाला नसल्याचे स्पष्ट होते.
काय म्हणाले होते?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संघाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.
सुरुवातीला आमची ताकद कमी होती. त्यामुळे आम्हाला संघाच्या पाठिंब्याची गरज होती. आज भाजप मोठा झाला असून तो सक्षम आहे. भाजप स्वावलंबी असून हाच मुख्य फरक असल्याचा दावा नड्डांनी केला.
केरळच्या पल्लकड येथे संघाच्या प्रमुख ३६ संघटनांची बैठक झाली होती. या बैठकीतही या वक्तव्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नव्हती. मात्र, आंबेकर यांनी ५ महिन्यांनंतर नड्डांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे.
केजरीवाल यांचे पुन्हा
सरसंघचालकांना प्रश्न निवृत्तीच्या वयाचा भाजपचा नियम लालकृष्ण अडवाणींप्रमाणे पंतप्रधान मोदींनाही लागू होतो का?जेव्हा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपल्या पक्षाला आपल्या वैचारिक मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही, असे म्हटले त्यावर त्यांना कसे वाटले?
पंतप्रधानांनी जून २०२३ मध्ये ज्या नेत्यावर भ्रष्टाचार प्रकरणी टीका केली, नंतर त्यांनाच पक्षात घेतले, तेव्हा तुम्हाला दु:ख झाले का?
केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाडणे हे आरएसएसच्या मूल्यांशी जुळते का?