नवी पुस्तके वाचण्यासाठी लोक वाचनालयात येतात. येथे तुम्हाला कोणत्याही विषयाची माहिती मिळते. परंतु आता लोक पुस्तके नाही तर माणसांना वाचायला सुरवात करत आहेत. राजधानी दिल्लीत मानवी वाचनालय (ह्युमन लायब्ररी) सुरू होत आहे. येथे तुम्ही पुस्तके नव्हे तर माणसे भाडे देऊन घेऊ शकाल. या वाचनालयाचे उद््घाटन १८ जून रोजी होत आहे. माणसांना वाचण्याची ही काहीशी वेगळी पद्धत आहे. परंतु आता ती रूढ झाली आहे. आपल्याला येथे ३० मिनिटांसाठी मानव पुस्तक भाड्याने मिळेल. ही माणसेच असतात. तुम्ही तुमची गरज व आवडी-निवडीनुसार त्यांना भाडे देऊन घेऊ शकतात. त्यांना तुम्ही सगळ््या प्रकारचे प्रश्न विचारू शकता. हे लोक त्यांचे अनुभव आणि इतर मुद्दे तुमच्याशी शेअर करतात. याशिवाय इतरही माहिती ते देतात. तुम्हाला नवी माहिती हवी असेल तर त्यासाठीही ते मदत करतात. तुमचे काम झाल्यावर काम झाल्यानंतर ते निघून जातात.या वाचनालयाचा मुख्य हेतू लोकांना शिक्षण देणे हा आहे. मग हे शिक्षण पुस्तकांकडून मिळो वा शिक्षकांकडून. हेच कारण आहे दिल्लीत पुस्तके नव्हे तर माणसे भाड्याने दिली जातात. या प्रकारच्या ह्युमन लायब्ररीची सुरवात डेन्मार्कमध्ये झाली. कोपेनहेगेनमध्ये २००० साली पहिले असे वाचनालय लोकांसाठी खुले करण्यात आले. रोनी एबर्गल यांनी त्याची सुरवात केली. आज जगात ८० देशांत ह्युमन लायब्ररी आहेत. भारतात सर्वात आधी हैदराबादमध्ये व नंतर मुंबईत हे असे वाचनालय सुरू झाले.
पुस्तके नव्हे, माणसे वाचा!
By admin | Published: June 20, 2017 1:03 AM