शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

वाचाळांनो, तोंड आवरा!

By admin | Published: October 19, 2015 3:14 AM

दादरी आणि गोमांस प्रकरणी वादग्रस्त विधाने करीत संघर्ष ओढवून घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आता ‘पुरे झाले, बोलणे आवरा’ या भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : दादरी आणि गोमांस प्रकरणी वादग्रस्त विधाने करीत संघर्ष ओढवून घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आता ‘पुरे झाले, बोलणे आवरा’ या भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा विधानांबद्दल तीव्र नाराजी व खेद व्यक्त केल्यानंतर शहा यांनी तडकाफडकी व्हीप जारी करीत त्यांना पाचारण केले आहे. दरम्यान, काँग्रेसने शहा यांनी स्वपक्षीयांना दिलेला इशारा म्हणजे केवळ राजकीय क्लृप्ती असल्याचे म्हटले.हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय मंत्री महेश शर्मा, खासदार साक्षी महाराज आणि आमदार संगीत सोम यांची कानउघाडणी करतानाच शहा यांनी अशा विधानांमुळे मोदी सरकारचा विकासाचा अजेंडा रुळावरून घसरेल, अशी भीती व्यक्त केली. दादरी येथील इकलाखची हत्या हे राज्य सरकारचे कायदा व सुव्यवस्था राखण्यातील अपयश असून, त्याच्याशी भाजपाला काहीही घेणेदेणे नव्हते, असे शहा यांनी या नेत्यांना सुनावताना म्हटले. भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने केल्यामुळे लोकांचे लक्ष समाजवादी पक्षावरून हटून भाजपकडे केंद्रित झाले. पक्षनेत्यांना समज देण्यासाठी मोदींनी काहीही केले नसल्याची टीका सुरू असतानाच मोदींनी आपला संताप कळविला. त्यानंतर शहा कामाला लागले.(लोकमत न्यूज नेटवर्क)>‘गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे,’ असे वेदांमध्ये सांगण्यात आले असल्याचे नमूद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पांचजन्य’ या मुखपत्रा-मधून दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून झालेल्या मोहम्मद इकलाख या मुस्लीम व्यक्तीच्या हत्येचे उघडउघड समर्थन केलेले आहे. >इकलाखची हत्या ‘विनाकारण’ करण्यात आलेली नाही आणि वेदांनीही गोहत्या करणाऱ्यांना ठार मारणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही या मुखपत्रात म्हटले आहे.>>>>>>>मुक्ताफळेमुस्लीम भारतात राहू शकतात; मात्र त्यांना बीफ खाणे सोडून द्यावे लागेल.- मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा दादरी गावी एका मुुस्लिमाला जमावाने जिवंत जाळणे हा केवळ अपघात होता.- महेश शर्मा, केंद्रीय मंत्रीपोलीस निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करीत असून, मुझफ्फरनगर दंगलीचा सूड उगविला जाईल.- संगीत सोम, भाजपाचे आमदार