समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्यास सामोरे जाण्यास भारत सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 09:08 PM2019-09-27T21:08:46+5:302019-09-27T21:10:10+5:30
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
कोल्लम (केरळ) - पाकिस्तानचे प्रशिक्षित दहशतवादी भारतावर समुद्रीमार्गे हल्ला करण्याची शक्यता आहे. मात्र, आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ आणि समुद्रमार्गे दहशतवादी हल्लास सामोरे जाण्यास भारत सज्ज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
केरळ येथील कोल्लममधील आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांची आणि बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचीही आठवणही राजनाथ सिंह यांनी यावेळी करून दिली. कच्छपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या सागरी तटांवर दहशतवादी हल्ला करणार नाहीत अशा संभ्रमात राहणं योग्य ठरणार नाही. मात्र, दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे प्रतिपादन सिंह यांनी केले. सागरी संरक्षणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.