लखनौ : लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे. दरम्यान, भाजप आणि काँग्रेसमधील शब्दयुद्धही तीव्र होत चालले आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर वादविवादास तयार आहोत, असे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी. लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती ए. पी. शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सार्वजनिक चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.
मी १०० टक्के तयार आहे, पण ‘ते’ आलेत का?nशुक्रवारी राजधानी लखनौमध्ये उपस्थित असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ‘मी पंतप्रधानांसह कोणाशीही कोणत्याही व्यासपीठावर वादविवादास १०० टक्के तयार आहे, पण मला माहीत आहे ते माझ्याशी वादविवाद करणार नाहीत. nआमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही अशाचप्रकारे वादविवाद करू शकतात,” असे स्पष्ट केले.
लिहून घ्या; भाजप निवडणूक हरणार राहुल गांधी आणि यादव यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी ‘इंडिया’च्या प्रचारसभेला संबोधित केले. “तुम्ही माझ्याकडून लेखी घ्या, भाजप निवडणूक हरणार आहे,” असा विश्वास व्यक्त करीत राहुल यांनी भारत जोडो, न्याय यात्रा आणि विरोधी प्रचारसभांचा उल्लेख केला. इंडिया आघाडीने गेल्या काही वर्षांत आवश्यक निवडणूक तयारी केली आहे. द्वेषाच्या बाजारात प्रेमाची दुकानेही उघडली गेली, असे ते म्हणाले.
राहुल गांधींनी चौकशीची मागणी करणे योग्यचदोन उद्योगपतींनी काँग्रेसला पैसे पाठवल्याच्या पंतप्रधानांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. या आरोपांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्यांची चौकशी करण्याची मागणी करणे योग्यच आहे. - पी. चिदंबरम, नेते, काँग्रेस
राहुल गांधी, रेवंत रेड्डी यांचा शहर बसमधून प्रवासलोकसभा प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हैदराबाद शहरात शहर बसने एकत्र प्रवास करताना दिसले. त्यांच्यासोबत सामान्य लोकही प्रवास करताना दिसत होते. या प्रवासाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तत्पूर्वी या दोन्ही नेत्यांनी प्रचारसभेत संबोधित केले होते.
काँग्रेस हिंदुविरोधी पक्ष; जनतेला लुटणे हा त्यांचा इतिहास : माेदीहैदराबाद : काँग्रेस हिंदूविरोधी असून जनतेला लुटणे, काही जणांचे लांगुलचालन करणे, घराणेशाही जोपासणे हा त्या पक्षाचा इतिहास आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायद्याला काँग्रेस पक्ष विरोध करतो. व्होट जिहादची भाषा केली जाते. अशा प्रवृत्तींना जनतेने पराभूत करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.