शहरं
Join us  
Trending Stories
1
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास विक्रमाला घातली गवसणी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
5
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
6
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
7
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
8
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
9
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
10
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
11
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
12
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
13
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
14
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
16
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
17
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
18
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
19
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
20
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले

काँग्रेसची खरी कसोटी विधानसभेवेळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 1:09 AM

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातनाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. अहमद पटेल यांनी गुजरातमधून भाजपाला उखडण्याची भाषा मंगळवारी विजयी झाल्यानंतर केली खरी; पण तसे करणे सोपे नाही. कारण त्यांनाच काही प्रमाणात गुजरातेत अंतर्गत विरोध आहे.

ठळक मुद्देयेणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातनाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. अहमद पटेल यांनी गुजरातमधून भाजपाला उखडण्याची भाषा मंगळवारी विजयी झाल्यानंतर केली खरी; पण तसे करणे सोपे नाही. कारण त्यांनाच काही प्रमाणात गुजरातेत अंतर्गत विरोध आहे.तेच जर विधानसभेच्या लढाईत सेनापती म्हणून पुढे आले, तर ही लढाई कोणत्या दिशेला जाईल हे सांगता येणार आहे. त्यातच पंतप्रधान व भाजपाध्यक्ष दोघे गुजरातचे असताना, त्या राज्यात मुसंडी मारून वर येणे हे काँग्रेससमोर आव्हान आहे.पटेल यांच्या सध्याच्या विजयामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण असले तरी जनता त्या पक्षाला विधानसभेत निवडून देते का, हा खरा मुद्दा आहे.

- संजीव साबडे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाविरोधात काँगे्रस असा सामना रंगला. त्यात अहमद पटेल यांची जागा राखण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असली तरी तब्बल १६ आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याने आता येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची खरी कसोटी लागणार आहे.गुजरात नाट्याचा पहिला अंक राज्यसभेच्या तीन जागांच्या निवडणुकांच्या निमित्ताने मंगळवारी रात्री पाहायला मिळाला. एका जागेसाठी काँग्रेस आणि भाजपातील बड्या नेत्यांनी आपली ‘वकिली’ बुद्धिमत्ता पणाला लावल्याचेही दिसून आले. नाट्य सुरू झाले काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना राज्यसभेवर निवडून आणण्याच्या लढाईने. मंगळवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपली मते दाखवल्याबद्दल ती बाद ठरविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने रात्री ११.३० वाजता मान्य केल्यानंतर मतमोजणी होऊ न १२.३० वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते; पण भाजपाने नंतरही आक्षेप घेतले आणि ती रखडली. त्यामुळे निकालास १.४५ वाजले. त्यात पटेल ४४ मते मिळवून विजयी झाल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार धावतच १ वाजून ४२ मिनिटांनीबाहेर आले आणि मग काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथे फटाक्यांची आतशबाजी आणि मिठाईचे वाटप सुरू केले. त्या वेळी भाजपा नेते व कार्यकर्त्यांच्या चेहºयावर प्रचंड अस्वस्थता दिसत होती. अहमद पटेल यांनी केलेल्या ‘सत्यमेव जयते’ अशा टिष्ट्वटनंतर विजयावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर पाच मिनिटांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हे दोघे ४६ मते मिळवून निवडून आल्याचे जाहीर झाले. मात्र, भाजपामध्ये उत्साह नव्हता. कारण पटेल जिंकले होते. ते शल्य त्यांच्या चेहºयावर जाणवत होते.फुटलेली दोन मते बाद ठरविण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सारी कायदेशीर ताकद पणाला लावली. निवडणूक आयोगाने ती बाद ठरवली नसती, तर पहिल्या फेरीत पटेल विजयी झालेच नसते. दोन मते बाद झाली नसती, तर बलवंतसिंह राजपूत यांची मतसंख्या ४0 झाली असती, तर पटेल यांच्या पारड्यात ४२ मते असती. निवडून येण्यासाठी ४४चा कोटा असल्याने मतदारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी घ्यावी लागली असती आणि त्यात राजपूत सहजच विजयी झाले असते. हे लक्षात आल्यानेच काँग्रेसने सारा आटापिटा केला; पण ५१ आमदार असतानाही पटेल यांना त्याहून कमी मते मिळाली. हे काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. राष्ट्रवादी, संयुक्त जनता दल व भाजपा बंडखोर यांचे प्रत्येकी एक मत पटेल यांना मिळाले, हे लक्षात घेता, काँग्रेस आमदारांची ४१ मतेच पटेल यांना मिळाली, असे दिसते. ५७ पैकी ६ आमदार आधीच काँग्रेसबाहेर पडलेले आहेत. आता या निवडणुकीच्या माध्यमातून आणखी दहा जण ‘बाहेर’च्या वाटेवर असल्याचेसिद्ध झाले आहे. ही काँग्रेससाठी डोकेदुखी आहे.