मुंबईकरांच्या सेवेचा संकल्पपाच वर्षांमधील तुमची विकासकामे कोणती?- या मतदारसंघात पायाभूत सुविधांचा अभाव होता़ बहुसंख्य झोपडपट्टी असलेल्या या विभागात दोन फुटांची जलवाहिनी टाकून मुबलक पाणीपुरवठा, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पंचतारांकित शौचालये, ४०-४५ समाजमंदिरे, मैदानांचा विकास करण्यात आला़ महाराष्ट्राचे कबड्डीपटू बुवा साळवी यांच्या स्मरणार्थ चार एकर भूखंडावर मैदान तयार करण्यात आले़ यात जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे़अशक्य प्रकल्प जो तुम्ही पूर्णत्वास नेला?- माझ्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही़ पाठपुरावा केल्यास अवघड काम शक्य आहे़ तरी मालाड पूर्व, कुरार गाव येथील एका प्रकल्पाबद्दल सांगेऩ शांताराम तलाव या मोठ्या भूखंडावर बिल्डर व राजकीय नेत्यांचा डोळा होता़ २० वर्षे हा भूखंड अतिक्रमणाच्या विळख्यात होता़ हा प्रकल्प प्राधान्याने अजेंड्यावर घेऊन आज या ठिकाणी रंगीत कारंजे, जॉगिंग ट्रॅक, खुला रंगमंच, वयोवृद्धांना बसण्यासाठी पॅगोडा, मुलांसाठी खेळाचे मैदान बांधण्यात आले आहे़ येथे तयार केलेल्या घाटात यंदा १४०० गणेशमूर्ती व दुर्गामातेच्या पावणेदोनशे मूर्तींचेही विसर्जन झाले़पुन्हा उमेदवारीस कारण काय?- १९७८ पासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे़ पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून सातव्यांदा मला निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे़ यापूर्वी तीन टर्म मी नगरसेवक होतो़ तसेच सेवा करण्याचा संकल्प केल्यामुळे पुन्हा निवडणूक लढवीत आहे़ माझ्या यशाची मला पूर्ण खात्री आहे़ निवडून आल्यानंतर कोणती कामे हाती घेणार?- दोन महत्त्वाचे प्रकल्प सध्या माझ्या अजेंड्यावर आहेत़ कुरार, आप्पा पाडा, क्रांती नगर अशा काही भागांमध्ये वाहतुकीची समस्या मोठी आहे़ विकास नियोजन आराखड्यात मंजूर रस्त्यांच्या मार्गातील पाच ते सहा हजार प्रकल्पबाधितांना एमएमआरडीएच्या सदनिकांमध्ये स्थलांतरित करून येथील रस्ते चांगले करून घेणार आहे़ तसेच मुख्यमंत्र्यांनी पूर्व व पश्चिम उपनगरात दोन रुग्णालये बांधण्याची घोषणा केली होती़ त्यानुसार नागरी निवारा परिषद येथील दहा एकर जागेवर अडीचशे ते तीनशे खाटांचे रुग्णालय बांधून घेण्यात येणार आहे़ यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर पत्रव्यवहारही सुरू आहे़
उमेदवारीस कारण की....
By admin | Published: October 10, 2014 2:38 AM