शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

राजस्थानात बंडखोर नेत्यांमुळे भाजपपुढे अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 5:31 AM

राजस्थानातील सत्ताधारी भाजपला आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षातील बंडखोरीमुळे मोठा फटका बसण्याची किंवा पराभवाला सामोरे जावे लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जयपूर  - राजस्थानातील सत्ताधारी भाजपला आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षातील बंडखोरीमुळे मोठा फटका बसण्याची किंवा पराभवाला सामोरे जावे लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या कार्यशैलीवर भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते नाराज असून, काही जणांनी पक्ष सोडायलाही सुरुवात केली आहे.ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र व बारमेर जिल्ह्यातील आमदार मानवेंद्र सिंह यांनी पदाचा व भाजपच्या सदस्यात्वाचाही राजीनामा दिला. याआधी घनश्याम तिवारी, हनुमान बेनिवाल, किरोडीसिंह बैन्सला या नेत्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. निवडणुकीत हे बंडखोर नेते काँग्रेसपेक्षा भाजपचीच मते खाण्याचा जास्त धोका आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांना बारमेर येथून भाजपने उमेदवारी नाकारली होती. ती गोष्ट मनाला लागलेले त्यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. राजघराण्याची पार्श्वभूमी व राजपूत समाजाचा असलेला भक्कम पाठिंबा ही मानवेंद्र सिंह यांची बलस्थाने आहेत. (वृत्तसंस्था)हे देऊ शकतात त्राससहा वेळा भाजपचे आमदार असलेले व दोनदा मंत्रिपद भूषविलेले घनश्याम तिवारी जूनमध्ये पक्षातून बाहेर पडले. त्यांनी भारत वाहिनी सेना नावाचा पक्ष स्थापन केला आहे.ब्राह्मण समाजातील प्रभावी नेते असलेल्या तिवारी यांची सिकर व जयपूर परिसरावर चांगलीच राजकीय पकड आहे. वसुंधराराजे यांच्याशी तीव्र मतभेद झाल्याने नागौर येथील जाट समाजाचे नेते हनुमान बेनिवाल यांनीही भाजपचा त्याग केला.देशभर २००८ साली गाजलेल्या गुज्जर आंदोलनातील नेते किरोडीसिंह बैन्सला यांनी २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढविली होती; पण ते पराभूत झाले. त्यानंतर ते या पक्षापासून कायमचेच दुरावले. हे चार व आणखी बंडखोर नेते आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला वात आणणार, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थान