कर्नाटकात काँग्रेसची यादी जाहीर होताच बंडखोरांनी थोपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:50 PM2018-04-16T23:50:23+5:302018-04-16T23:50:23+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली खरी. पण, तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले. काही नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनाम्याची धमकी दिली तर, काहींनी नेतृत्वाविरोधोत दंड थोपटले आहेत.

 The rebels have imposed a fine when the list of Congress is announced in Karnataka | कर्नाटकात काँग्रेसची यादी जाहीर होताच बंडखोरांनी थोपटले दंड

कर्नाटकात काँग्रेसची यादी जाहीर होताच बंडखोरांनी थोपटले दंड

Next

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली खरी. पण, तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले. काही नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनाम्याची धमकी दिली तर, काहींनी नेतृत्वाविरोधोत दंड थोपटले आहेत.
यादी जाहीर होताच हंगल, मायाकोंडा, जगलूर, टिपूर, कुनीगल, कोलार, कोलेगल, बेलूर, बादामी, किट्टुर आदी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे उघड झाले. माजी मंत्री मनोहर तहसिलधर यांना तिकीट नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी विरोध प्रदर्शने केली. जगलुरचे आमदार एच.पी. राजेश यांनीही यादीत नाव नसल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांच्या भेटण्यासाठी धाव घेतली आहे.

‘सिद्धरामय्या तुघलक काँग्रेस’
बंगळुरुतील सी.व्ही. रमण नगरमधून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. रमेश यांनी याच जागेवरुन जनता दल सेक्युलरकडून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. ‘ही इंदिरा गांधी काँग्रेस नसून सिद्धरामय्या तुघलक काँग्रेस आहे’अशी टीका त्यांनी केली आहे. हे मतभेद म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे व डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्षाची अभिव्यक्ती आहे. पण, नाराज नेते तूर्त सिद्धरामय्या यांना लक्ष्य करीत आहेत.

Web Title:  The rebels have imposed a fine when the list of Congress is announced in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.