नवी दिल्ली : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात वर्षाच्या प्रारंभी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या दहा शहिदांना शौर्यपदक देण्याची शिफारस केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) केली आहे. शिवाय नक्षलवाद्यांच्या प्राणघातक हल्ल्यादरम्यान आपल्या शहीद सहकाऱ्यांना सोडून दिल्याबद्दल १७ जवानांना निलंबित केले.नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत ११ जवान शहीद झाले होते. त्यापैकी दहा जवानांची शौर्यपदकासाठी शिफारस करण्यात आली आहे. या घटनेचे वास्तव न्यायालयीन चौकशीतून उघड झाले. ११ मार्चला घडलेल्या घटनेनंतर लगेच चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणात सीआरपीएफने १७ जवानांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली आणि त्यांना निलंबित केले. नक्षलवाद्यांच्या प्राणघातक हल्ल्यादरम्यान या निलंबित जवानांनी मदत करण्याऐवजी शहीद सहकारी आणि इतर नागरिकांना तेथेच सोडून पळ काढला होता, असे चौकशीत आढळून आले. या घटनेत ११ जवानांसह १६ जण ठार झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१० शहिदांना शौर्यपदक देण्याची शिफारस
By admin | Published: September 10, 2014 6:04 AM