शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 7:05 AM

विदर्भ चाळिशीपार; नागपुरात उष्माघाताने ६ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी दुपारी आजवरचे ऐतिहासिक ५२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुढे आले,  परंतु दिल्लीत एवढे तापमान अशक्य आहे. सेन्सरमधील त्रुटींमुळे विक्रमी तापमानाची नोंद झाली. दिल्लीतील सरासरी तापमान हे ४६.८ अंश सेल्सिअस इतकेच होते, असे स्पष्टीकरण भारतीय हवामान विभागाच्या वतीने देण्यात आले.

काही दिवसांपासून दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. मंगळवारी दिल्लीच्या मुंगेशपूरमध्ये ४९.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत मुंगेशपूरमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजता ५२.९ अंश तापमानाची झाली. दिल्लीच्या पाऱ्याने राजस्थानलाही मागे टाकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त झाले. परंतु काही वेळाने हवामान विभागानेही शंका उपस्थित केली. 

देशात हरयाणाच्या रोहतकमध्ये बुधवारी सर्वाधिक ४८.८ अंश तापमान असल्याचे हवामान विभागाच्यावतीने रात्री उशिरा स्पष्ट करण्यात आले. ताेपर्यंत दिल्लीच्या विक्रमी तापमानाचीच देशभरात गरमागरम चर्चा रंगली हाेती.

३ तासांची पगारी रजा

दिल्लीतील तापमानवाढीची दखल घेत उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी भर उन्हात काम करणाऱ्या कामगारांना दुपारी १२ वाजेपासून ३ वाजेपर्यंत तीन तासांच्या पगारी रजेची घोषणा केली आहे. तसेच कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

विदर्भ चाळिशीपार; नागपुरात उष्माघाताने ६ मृत्यू

  • नवतपामुळे विदर्भात बुधवारीदेखील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा चाळिशीच्या पुढे राहिला. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 
  • विदर्भात सूर्याचा प्रकोप पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 
  • वाढत्या तापमानामुळे बुधवारी नागपुरात सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. आर्द्रता काही प्रमाणात घटल्याने दमट वातावरणाची जाणीव कमी झाली; पण उन्हाच्या झळा मात्र त्रासदायक ठरल्या आहेत. 
  • दिवसासाेबत रात्रीही उष्ण लहरींचा प्रभाव वाढल्याचे जाणवत आहे.

टॅग्स :delhiदिल्लीSummer Specialसमर स्पेशलHeat Strokeउष्माघातVidarbhaविदर्भ