शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

रेकॉर्डब्रेक! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बत 67.1 टक्के मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 4:54 PM

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांचा भरपूर उत्साह दिसून आला असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये विक्रमी मतदान झाले आहे.

नवी दिल्ली - सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आटोपून आता निकालाची वेळ आली आहे. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांचा भरपूर उत्साह दिसून आला असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये तब्बल 67.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्यावेळच्या मतदानापेक्षा मतदानाचा टक्का यावेळी वाढला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 543 जागांसाठी 66.44 टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षा यावेळी अधिक मतदान झाले आहे. गेल्या 16 लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास मतदानाच्या टक्केवारीमध्ये सातत्याने चढउतार होत असल्याचे दिसून येते. 1951-52 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वात कमी होती. त्यावेळी केवळ 45.67 टक्के मतदान झाले होते. नंतरच्या काळाता थोड्या बहुत प्रमाणात का होईना मतदानाची टक्केवारी वाढत गेली. 1957 मध्ये 47.74 टक्के, 1962 मध्ये 55.42 टक्के, 1967 मध्ये 61.33 टक्के, 1971 मध्ये 55.88 टक्के, 1977 मध्ये 60.49 टक्के,  1980 मध्ये 56.92 टक्के,  1984-85 मध्ये 64.01 टक्के, 1989 मध्ये 61.95 टक्के, 1991-92 मध्ये 55.88 मध्ये,  1996 मध्ये 57.94 टक्के,  1998 मध्ये 61.97 टक्के, 1999 मध्ये 59.99 टक्के, 2004 मध्ये 57.19 टक्के, 2009 मध्ये 58.19 टक्के आणि 2014 मध्ये 66.44 टक्के मतदान झाले होते.  

आता नुकत्याचा आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाने प्रथमच 67 टक्क्यांचा आकडा पार केला आहे. यावेळी 67.1 टक्के मतदान झाले आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIndiaभारत