बंगळूर : वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या आणि त्यांच्या कंपन्यांकडे असलेली ६,२0३ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करा, असे आदेश ऋण वसुली न्यायाधिकरणाने (डीआरटी) स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँक समूहाला दिला आहे. डीआरटीचे पीठासीन अधिकारी के. श्रीनिवासन यांनी आदेशात म्हटले की, मल्ल्या व त्यांच्या यूबीएचएल, किंगफिशर फिनवेस्ट आणि किंगफिशर एअरलाइन्स सह अन्य कंपन्यांकडे असलेली ६,२0३ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची कारवाई सुरू करावी. ही रक्कम ११.५ टक्के वार्षिक व्याजाने वसूल करण्यात यावी. (वृत्तसंस्था)
मल्ल्याकडून वसुली करा
By admin | Published: January 20, 2017 6:26 AM