नाकाबंदीच्या नावाखाली रामानंद नगर पोलिसांकडून वसुली
By admin | Published: December 06, 2015 11:51 PM
जळगाव: रविवारी शहरात पोलीस दलाकडून नाकाबंदी व पेट्रोलिंग राबविण्यात आली. या नाकाबंदीच्या नावाखाली रामानंद नगर पोलिसांकडून गणपती नगर, डीमार्ट, काव्यरत्नावली चौकात वाहनधारकांना अडवून वसुली मोहीम राबविण्यात आली. यावेळी नवख्या कर्मचार्यांकडून वाहनधारकांना उद्धटपणाची वागणूक देण्यात आली.
जळगाव: रविवारी शहरात पोलीस दलाकडून नाकाबंदी व पेट्रोलिंग राबविण्यात आली. या नाकाबंदीच्या नावाखाली रामानंद नगर पोलिसांकडून गणपती नगर, डीमार्ट, काव्यरत्नावली चौकात वाहनधारकांना अडवून वसुली मोहीम राबविण्यात आली. यावेळी नवख्या कर्मचार्यांकडून वाहनधारकांना उद्धटपणाची वागणूक देण्यात आली. गणपती नगर, आदर्श नगर परिसरात पोलीस कर्मचारी रस्त्यावर थांबून वाहने अडवत होते. कागदपत्रे व लायसन्सची तपासणी करुन मेमो दिला जात होता तर काहीजण मेमोचा धाक देवून वसुली करीत होते. सामान्य नागरीक वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असेल तर त्याला शंभर रुपये दंडाची पावती दिली जात होती, त्याच वेळी पोलीस कर्मचारीही वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना तर काही तीन सीट दिसून आले, त्यांच्यावर मात्र कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती. नवख्या कर्मचार्यांकडून कारवाईचा अतिरेक होत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांनी केल्या. तर वाहतूक शाखेचे काम पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत असल्याने त्याबाबतही आर्य व्यक्त करण्यात आले.