सावकारी कर्जमाफीत लातूर निरंक वेळेत झाली वसुली: औसा वगळता इतर तालुक्यात शेतकर्यांना सावकारी कर्जच नाही़
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM
लातूर :महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्यांनी परवानाधारक सावकाराकडूंन घेतलेले कर्ज भरून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़परंतु लातूर जिल्ातील औसा तालुक्यातील २२ शेतकर्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज सावकाराकडे भरलेले आहे़ इतर तालुक्यातून शेतकरी सोडून व्यापारी व मजुरांनाच कर्ज दिल्याने लातुर जिल्ातील एकाही परवानाधारक सावकारांचा कर्जमाफीसाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दाखल क रण्यात आलेला नाही़ त्यामुळे परवानाधारक सावकराकडील कर्जमाफीच्या प्रक्रियेत लातूर जिल्हा निरंक असल्याचे समोर आले आहे़
लातूर :महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्यांनी परवानाधारक सावकाराकडूंन घेतलेले कर्ज भरून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़परंतु लातूर जिल्ातील औसा तालुक्यातील २२ शेतकर्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज सावकाराकडे भरलेले आहे़ इतर तालुक्यातून शेतकरी सोडून व्यापारी व मजुरांनाच कर्ज दिल्याने लातुर जिल्ातील एकाही परवानाधारक सावकारांचा कर्जमाफीसाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दाखल क रण्यात आलेला नाही़ त्यामुळे परवानाधारक सावकराकडील कर्जमाफीच्या प्रक्रियेत लातूर जिल्हा निरंक असल्याचे समोर आले आहे़इच्छुक परवानाधारक कर्ज वाटप केलेल्या सावकरांनी नाव,पत्ता,अनुज्ञप्तीची छायाप्रत,परवान्याचे कार्यक्षेत्र,अनुज्ञप्ती ज्या नावाने धारण केली आहे त्या बँकेचे नाव आदी माहीतीसह कर्जमाफीचा प्रस्ताव, प्रस्तावासोबत शेतकर्याचा सातबारा, आठ अ,निवडणुक ओळखपत्र, आधारकार्ड, शिधापत्रिकेसह इतर महीतीसह परवानाधारक सावकाराकडे पाठविण्याचे अवाहन करण्यात आले होते़ सदरील आहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे जुनअखेरपर्यंत पाठविण्याचे अवाहन करण्यात आले होते परंतु लातूर जिल्ातील रेणापूर, चाकू र, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, देवणी,निलंगा,जळकोट, उदगीर व लातूर तालुक्यातून शेतक री वगळता व्यापारी व मजुरांनाच सावकारांनी कर्ज वाटप केले होते़तर औसा तालुक्यातील २२ शेतकर्यांना परवानाधारक सावकारांनी कर्ज दिले होते़त्याची मुद्दल रक्कम १ लाख ८३ हजार होती़त्यावर व्याज २७ हजार ़असे एकुण २ लाख १० हजार रूपये कर्जाचे शेतकर्याना वाटप करण्यात आले होते़परंतू त्या रक्कमेची वसुल झाल्याने लातूर जिल्ातील एकाही परवानाधारक सावकारांचा कर्जमाफीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकाकडे दाखल करण्यात आला नसल्याने मुदतीपुर्वीच परवानाधारक सावकारीच्या कर्जमाफीत लातूर निरंक असल्याचा अहवाल विभागीय कार्यालयाकडे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पाठविला आला आहे़व्यापारी व मजुरांना प्राधान्य़़़लातुर जिल्ातील औसा वगळता इतर ९ तालुक्यातील व्यापारी व मजुरांनाच कर्ज दिले होते़यामध्ये शेतकर्यांचा समावेशच नसल्याचे सावकारांच्या कर्जमाफीचा प्रश्नच उरला नाही़परिणामी तालुक्यात व्यापारी व मजुरांना प्राधान्या दिल्याने कर्जमाफीला शेतकरी मुकला आहे़शंभरटक्के कर्जवसुली़़़ जिल्ात फक्त औसा तालुक्यातील २२ शेतकर्यांना परवानाधारक सावकारांनी कर्ज दिले होते़त्याची मुद्दल रक्कम १ लाख ८३ हजार, व्याज २७ हजार अशा एकुण २ लाख १० लाखाच्या रक्कमेची वसुलीही वेळेत झाली़त्यामुळे परवानाधारक सावकारातून कर्जमुक्तीचा एकही प्रस्ताव दाखल नाही़