LICHFL Vacancy 2020: जीवन बीमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) भरती निघाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनीपासून असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांचे वार्षिक पे स्केल १४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे.
जर तुम्ही एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री घेतली असेल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या पदांवर अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली जात आहे.
पदे - मॅनेजमेंट ट्रेनी - ९ असिस्टंट मॅनेजर - ११
अर्ज कसा कराल? अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० देण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पुढे दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिट लिस्टच्या आधारेच सरळ भरती केली जाणार आहे.
LICHFL Job Notification पाहण्यासाठी इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...
ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये भरती
Sarkari Job Vacancy 2020: ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये नॉन फॅकल्टी ग्रुप बी व सीच्या शेकडो पदांवर भरती काढण्यात आली आहे. यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांची भोपाळच्या एम्समध्ये (AIIMS Bhopal) नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती वेगवेगळ्या पदांवर केली जाणार असून १० वी पास ते पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या पदभरतीची नोटीस बेसिलने वेबसाईटवर जारी केली आहे. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ही १० डिसेंबरपासून सुरु झाली आहे. याच्या लिंक बातमीच्या खाली देण्यात येत आहेत.
पदांची एकूण संख्या - ७२७
पदे कोणती? कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, स्टेनोग्राफर, अपर व लोवर डिव्हिजन क्लार्क, स्टोअर कीपर, एडमिन ऑफिसर, असिस्टेंट इंजीनियर, पब्लिक हेल्थ नर्स, लायब्रेरियन, मॅनेजर, डाएटीशियनसह अनेक पदांवर जागा भरण्यात येणार आहेत. कोणत्या पदासाठी शिक्षण, वयाची अट आदी माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. याची लिंक खाली देण्यात आली आहे.