दमदार पावसामुळे टँकरची संख्या निम्म्यावर टंचाई : चाळीसगाव व पारोळा तालुक्यात टँकर बंद
By admin | Published: July 05, 2016 12:28 AM
जळगाव : जिल्हाभरात होत असलेल्या दमदार पावसामुळे टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे १०५ पर्यंत पोहचलेल्या टँकरची संख्या आता जिल्ह्यात ५५ पर्यंत आली आहे. सध्या ६८ गावांमध्ये ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जळगाव : जिल्हाभरात होत असलेल्या दमदार पावसामुळे टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे १०५ पर्यंत पोहचलेल्या टँकरची संख्या आता जिल्ह्यात ५५ पर्यंत आली आहे. सध्या ६८ गावांमध्ये ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.सलग दोन वर्ष अत्यल्प पाऊस झाल्यामुळे यावर्षी टंचाईच्या स्थितीत वाढ झाली होती. जामनेर, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक टंचाईच्या झळा बसत होत्या. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टँकरची संख्या १०५ पर्यंत पोहचली होती. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात दमदार पावसाला सुरुवात झाल्याने १ जुलैपर्यंत ९९ गावांमध्ये ८४ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात होता. चाळीसगाव व चोपडा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या ठिकाणच्या जलपातळीत काही प्रमाणात वाढ होऊन टंचाई कमी झाली.चाळीसगाव तालुक्यातील तब्बल १४ तर पारोळा तालुक्यातील १५ टँकर कमी झाले आहेत.सध्या जळगाव तालुक्यात ९, जामनेर तालुक्यातील २२ गावांमध्ये १९ टँकर, भुसावळ तालुक्यात २, मुक्ताईनगर तालुक्यात २, भडगाव तालुक्यात ४, अमळनेर तालुक्यात १०, पारोळा तालुक्यात ६ अशा ६८ गावांमध्ये ५५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात १० शासकीय टँकर तर ४५ खाजगी टँकरचा समावेश आहे. जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात अमळनेर, जळगाव व जामनेर तालुक्यातील टँकर कमी होण्याची शक्यता आहे.