‘विशेष’ सेवेला नकार, म्हणून अंकिताची हत्या; भाजप नेत्याच्या मुलाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 09:34 AM2022-09-25T09:34:33+5:302022-09-25T09:35:07+5:30
मुलीने आपल्या एका मित्रासोबत केलेल्या चॅटवरून ही माहिती समोर आली आहे.
डेहराडून : रिसॉर्टमध्ये येणाऱ्या अतिथींना विशेष सेवा देण्यासाठीचा दबाव झुगारल्याने १९ वर्षीय अंकिताची हत्या करण्यात आली, असा दावा उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी केला आहे. या मुलीने आपल्या एका मित्रासोबत केलेल्या चॅटवरून ही माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी उत्तराखंडमधील मंत्रिपदाचा दर्जा असलेले ज्येष्ठ भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य याला हत्येच्या आरोपावरून शुक्रवारी अटक केली. विनोद आर्य यांना भाजपतून निलंबित करण्यात आले आहे. पुलकित याचा भाऊ अंकित आर्य यालाही भाजपमधून काढण्यात आले आहे. पोलीस व प्रशासनाने हा रिसॉर्ट बुलडोझर घालून रातोरात पाडून टाकला. रिसॉर्टचा व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहायक व्यवस्थापक अंकित गुप्ता हे दोघेही यात आरोपी आहेत.