लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : निवडणुकांदरम्यान मतदान केंद्रावर रांगेत उभ्या मतदारांची ब्रीदलायझर चाचणीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. प्रसिद्धी मिळविण्यासाठी ही याचिका केली आहे, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.
जनवाहिनी पक्षाच्या आंध्र प्रदेश शाखेने ही याचिका केली होती. आचारसंहितेमुळे मतदाराला मद्यधुंद अवस्थेत मतदान करता येणार नाही. रांगेत उभ्या असलेल्या मतदारांची ब्रीदलायझर चाचणी करण्यात यावी, असे याचिकेत म्हटले होते. यावर झालेल्या सुनावणीत न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.
‘मतदानाच्या दिवशी असतो ड्राय डे’सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ही याचिका आम्ही फेटाळत आहोत. मतदानाच्या दिवशी ड्राय डे असतो. पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त असतो ही बाब न्यायालयाने हा निर्णय देताना लक्षात घेतली आहे.