रुग्णास भेटू देण्यास नकार; सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड डॉक्टरांना मारहाण : रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या अफवेने उडाला गोंधळ
By admin | Published: June 07, 2016 7:41 AM
जळगाव: अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णास भेटू देण्यास नकार देत कंपाऊडरने नातेवाईकावर लोखंडी सळई उगारल्याने संतप्त नातेवाईकांनी कंपाऊंडरला मारहाण करत सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता घडली. दरम्यान, यावेळी रुग्णाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने अधिकच गोंधळ उडाला.
जळगाव: अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णास भेटू देण्यास नकार देत कंपाऊडरने नातेवाईकावर लोखंडी सळई उगारल्याने संतप्त नातेवाईकांनी कंपाऊंडरला मारहाण करत सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता घडली. दरम्यान, यावेळी रुग्णाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने अधिकच गोंधळ उडाला.धानवड ता.जळगाव येथील शिवाजी भिका पाटील (वय ३५) यांना शनिवारी सहयोग क्रिटीकल या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिमद्य सेवनामुळे शरीरातील क्षार कमी झाल्याने पाटील यांच्या मेंदू व शरीरातील नसांना सुज येत आहे, त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.भेटण्यावरून पडली वादाची ठिणगीशिवाजी पाटील यांना दाखल केले त्या दिवसापासून त्यांची प्रकृती बरी होती. दररोज ते आहार घेत होते. सोमवारी सकाळी त्यांना भेटण्यास डॉक्टरांनी मज्जाव केला. दररोज त्यांना आहार दिला जात असताना आज आहार दिला गेला नाही, त्यामुळे त्यांची तब्येत चिंताजनक झाली असावी अशी शंका नातेवाईकांना आली. संध्याकाळी भाऊ रवींद्र भिका पाटील व चुलत भाऊ मनोज विठ्ठल पाटील यांनी पुन्हा रुग्णास भेटण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र तेव्हाही कंपाऊंडरने भेटू दिले नाही. त्यामुळे रुग्णाच्या तब्येतीविषयी नातेवाईकांची चिंता अधिकच वाढली, आणि तेथे वादाची ठिणगी पडली.कंपाऊडरने लोखंडी सळई काढलीया वादात एका कंपाऊंडरने रुग्णाच्या नातेवाईकास मारण्यासाठी लोखंडी सळई काढली, त्यामुळे संतप्त दहा ते पंधरा नातेवाईकांनी रुग्णालयाच्या काचा फोडून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, यावेळी खुर्च्याही फेकण्यात आल्या.त्याच दरम्यान, रुग्णाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने अधिकच गोंधळ झाला. काही नातेवाईक डॉ.मनोज पाटील, डॉ.सुनील पाटील , डॉ.ए.आर.खेडकर व कर्मचारी अलका काळे यांच्या अंगावर धावून गेले. जमावाच्या संतप्त भावना पाहता डॉक्टर व कर्मचार्यांनी स्वत:चा बचाव केला.शिवसैनिक दाखलदाखल रुग्ण हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या गावाचा असल्याने ते लागलीच रुग्णालयात धावून आले. त्यांच्यासोबत महानगर प्रमुख कुलभूषण पाटील, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक धावून आले. त्यापाठोपाठ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक निरीक्षक दीपक गंधाले, जानकर यांच्यासह कर्मचार्यांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. ठाकूर व शिवसेच्या पदाधिकार्यांनी डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करून वाद मिटवला.