हंजीर प्रकल्पातून २ ट्रक भंगार चोरीस मक्तेदाराचा प्रकल्प सुरू करण्यास नकार : स्वमर्जीने केला लवादक नियुक्त
By admin | Published: November 07, 2015 12:04 AM
जळगाव : मनपाने आव्हाणे शिवारात बीओटी तत्वावर उभारलेल्या हंजीर बायोटेक व गेल्या अडीच वर्षांपासून बंद पडलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून गुरूवारी सायंकाळी दोन ट्रकमध्ये क्रेनच्या सहाय्याने भंगार भरून लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान मक्तेदाराने प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास नकार देत परस्पर लवादकाची नेमणूक केल्याबाबतचे पत्र मनपाला शुक्रवारी प्राप्त झाले. त्यामुळे मनपाने तातडीने पत्र पाठवून लवादक नियुक्तीला हरकत घेतली आहे.
जळगाव : मनपाने आव्हाणे शिवारात बीओटी तत्वावर उभारलेल्या हंजीर बायोटेक व गेल्या अडीच वर्षांपासून बंद पडलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून गुरूवारी सायंकाळी दोन ट्रकमध्ये क्रेनच्या सहाय्याने भंगार भरून लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान मक्तेदाराने प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास नकार देत परस्पर लवादकाची नेमणूक केल्याबाबतचे पत्र मनपाला शुक्रवारी प्राप्त झाले. त्यामुळे मनपाने तातडीने पत्र पाठवून लवादक नियुक्तीला हरकत घेतली आहे.मनपाने मे २००७ मध्ये हंजीर बायोटेक पुणे यांच्याशी मनपाच्या आव्हाणे शिवारातील जागेवर बीओटी तत्वावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी करार केला होता. १२ जून २०१० रोजी कार्यान्वित झालेला हा प्रकल्प मक्तेदाराने आग लागल्याचे निमित्त करीत परस्पर २४ जून २०१३ पासून बंद करून टाकला आहे. या ठिकाणी असलेले जनरेटर व इतर सामान मक्तेदाराने घेऊन जाण्याचा प्रयत्न मनपाच्या तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील व कर्मचार्यांनी हाणून पाडला होता. मात्र त्यानंतरही मनपा प्रशासनाने या ठिकाणी केवळ दिवसाच कर्मचारी नेमले असल्याने मोठ्या प्रमाणावर भंगार चोरीस जात आहे. मक्तेदाराकडूनही ट्रकमध्ये क्रेनच्या सहाय्याने भंगार भरून नेले जात असल्याचे समजते. गुरूवारी देखील दोन ट्रकमध्ये भंगार भरून नेण्यात आल्याचे समजते. हा प्रकार समजताच भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी उपायुक्त प्रदीप जगताप, आरोग्याधिकारी उदय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही. शुक्रवारी याची माहिती देऊनही प्रकल्प आपल्या ताब्यात नसल्याचे कारण देत त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले. ---- इन्फो----लवादकाच्या नियुक्तीला मनपाची हरकतमक्तेदार हंजीर बायोटेकला मनपा आयुक्तांनी प्रकल्प परस्पर बंद केल्याने अंतिम सुनावणी नोटीस बजावली होती. त्यावेळी मक्तेदाराने उपस्थित राहून धार्मिक सण असल्याने आठ-पंधरा दिवस वेळ द्या, प्रकल्प सुरू करतो, असे सांगितले होते. मात्र त्यानंतर शुक्रवारी मक्तेदाराकडून मनपाला या प्रकल्पासंदर्भातील वाद सोडविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मोहीत एस. शहा यांची नियुक्ती करीत असल्याचे पत्रच प्राप्त झाले. त्यामुळे मक्तेदार आता प्रकल्प सुरू करणार नाही, हे देखील स्पष्ट झाले आहे. मनपाने तातडीने मक्तेदाराला शुक्रवारी पत्र पाठविले असून त्यात मक्तेदाराने ३ मे २००७ रोजी मनपाला करून दिलेल्या करारातील अट क्र.९ नुसार वाद उद्भवल्यास लवादक म्हणून आयुक्त असतील. त्यांचा निर्णय दोन्ही पक्षांवर बांधील राहील, असे मान्य केले आहे. त्यामुळे शहा यांची लवादक म्हणून नियुक्ती करण्यास मनपाने हरकत घेतली आहे.