नवी दिल्ली : युनायटेड बँक ऑफ इंडियाने ‘विलफुल डिफाल्टर’ घोषित केल्याच्या विरोधात किंगफिशर एअरलाईन्सने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने विचार करण्यास नकार दिला. बँकेच्या तक्रार निवारण समितीने यासंदर्भात अगोदरच निर्णय दिला आहे. त्यामुळे किंगफिशर एअरलाईन्सची याचिका निर्थक ठरली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तुमची तक्रार होती की, तक्रार निवारण समितीने या प्रकरणी निर्णय घ्यायला नको होता, परंतु समितीने अगोदरच निर्णय घेतला आहे. तेव्हा आपली याचिका निर्थक ठरली आहे, असे न्या. ए.आर. दवे आणि न्या. यू.यू. ललित यांचे पीठ म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)