शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

भाजपाविरोधात प्रादेशिक आघाडी

By admin | Published: October 07, 2014 5:22 AM

पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे राजकारण करीत असल्याने भाजपाविरोधात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांनी जोरदार आघाडी उघडली आहे.

संदीप प्रधान, मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ््या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे राजकारण करीत असल्याने भाजपाविरोधात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांनी जोरदार आघाडी उघडली आहे.विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चा अखेरच्या टप्प्यात असताना भाजपाने शिवसेनेची साथ सोडली. स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळ सर्वच पक्षांवर आली. हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रात भाजपाने आपला मित्रपक्ष असलेल्या प्रादेशिक पक्षाला दगा दिला. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांना असाच भाजपाने दगा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे हे अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, की गुजरातचे? असा थेट सवाल केला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे निकालानंतर भाजपा व शिवसेना एकत्र येतील, अशी भाषा करीत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अगोदर युती का तोडली, असा सवाल करीत आहेत. त्यामुळे राजकारणात परस्परांचे विरोधक असलेले उद्धव व राज हे सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून मोदींच्या गुजरातचा टेंभा मिरवण्यावर प्रहार करीत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही भाजपाच्या जाहिरातीमधून महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा मुद्दा मांडत आहेत. तर राष्ट्रवादी व त्यांची व्होटबँक असलेल्या मराठा समाजाला भाजपाविरुद्ध चेतवण्याचा प्रयत्न शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केला आहे. शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी या पक्षाच्या हमखास विजयाची खात्री असलेल्या जागा सोडता अन्यत्र ज्या पक्षाच्या उमेदवारांना प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विजयाची संधी दिसत असेल अशा उमेदवाराला मते ट्रान्सफर करण्याची खेळी करून भाजपाला रोखण्याची रणनिती हे तीन पक्ष राबवू शकतात, असे काही नेत्याचे मत आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला वेळीच महाराष्ट्रात रोखले नाही तर हा भाजपा आपल्यालाही गिळंकृत करील हे तिघांच्याही लक्षात आले आहे.