शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान - प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 4:29 AM

अद्रमुकने वेगळी भूमिका घेतल्यामुळे अटलबिहारींचे सरकार अवघ्या एका मताने पडले होते. देशाच्या राजकारणात आर्थिक स्थैर्यासाठी हे योग्य आहे काय याचा विचार जनतेने केला पाहिजे.

प्रश्न : राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कितपत आहे?उत्तर : भारतीय राजकारणात अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष आहेत हे वास्तव आहे. प.बंगाल, तामिळनाडू, ओडिशा अशी त्यातील काही उदाहरणे आहेत. प्रादेशिक पक्षांचा अजेंडा हा त्या त्या राज्यांचे हित लक्षात घेऊन तयार होतो. राष्ट्रीय राजकारणात त्यांची एकवाक्यता नसते. उदाहरण म्हणून कावेरी पाणीवाटपाच्या प्रश्नाकडे पहा. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळची भूमिका त्याबाबत वेगवेगळी आहे. राजकीय लाभहानीचा विचार करून हे पक्ष राष्ट्रीय राजकारणात भूमिका घेतात. अद्रमुकने वेगळी भूमिका घेतल्यामुळे अटलबिहारींचे सरकार अवघ्या एका मताने पडले होते. देशाच्या राजकारणात आर्थिक स्थैर्यासाठी हे योग्य आहे काय याचा विचार जनतेने केला पाहिजे. केंद्रातील सरकार एनडीएचे सरकार आहे. मित्रपक्ष वाढवून त्याचा विस्तार आम्ही करू इच्छितो. जितके पक्ष बरोबर येतील तेवढे चांगलेच आहे.प्रश्न : २०१४ साली पूर्ण बहुमताचे मोदी सरकार सत्तेवर आले. २०१९ साली कुणाचे सरकार सत्तेवर येईल हे काळ ठरवेल, मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजस्थान, मध्यप्रदेश अन् छत्तीसगडमध्ये भाजपने सत्ता गमावली नेमकी काय गडबड झाली?उत्तर : भाजप ही थिंकिंग पार्टी आहे. आम्ही निवडणूक जिंकलो अथवा हरलो तरी निकालांचे बारकाईने विश्लेषण करतो. आत्ममंथन नेहमीच करतो, त्यानुसार यंदाही होईल. तीन राज्यांपुरते बोलायचे तर मध्य प्रदेशात भाजपला काँग्रेसपेक्षा ३० हजार मते अधिक मिळाली. थोड्या फरकाने काँग्रेसला काही जागा अधिक मिळाल्या. त्यात सत्तेचे अंकगणित जमले नाही. अर्थात याचा अर्थ मध्य प्रदेशात जनतेने आम्हाला नाकारले असा होत नाही. राजस्थानात चुरशीची लढत झाली. भाजप अन् काँग्रेस दोघांनाही ३८ टक्के मते मिळाली. काँग्रेसला आमच्यापेक्षा १.५० लाख मते अधिक मिळाली. २०१४ साली केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हा काँग्रेसकडे १६ अन् भाजपकडे अवघी सहा राज्ये होती आता भाजपकडे १६ राज्यांची सत्ता आहे अन् काँग्रेस पाच राज्यात सीमित झाली आहे. छत्तीसगडचा निकाल अनपेक्षित आहे. त्याचे मंथन आम्ही जरूर करू.प्रश्न : मतदार भाजपवर रागावले आहेत. निकालांमधून त्याचे प्रत्यंतर आले आहे. शेती व शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, नोटाबंदी, तरुणांची बेरोजगारी अशी प्रमुख कारणे आहेत. त्यावर आपले म्हणणे काय?उत्तर : कोणत्याही एका पक्षावर देशातील १०० टक्के लोक खूश आहेत असे कधीही होत नाही. २०१४ साली आम्हाला ३१ टक्के मते मिळली होती आता ५१ टक्के मते मिळवण्यासाठी आमची तयारी चालू आहे. नोटाबंदीत सामान्य माणसाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. सर्वांना आपल्या नोटा बदलून मिळाल्या. शेती अन् शेतकºयांच्या समस्या काही चार वर्षातल्या नाहीत. अनेक वर्षांपासून आहेत. शेतीच्या दुरवस्थेसाठी काँग्रेस राजवटीतील विनाशकारी धोरण कारणीभूत आहे. स्वामीनाथन आयोगाची स्थापना वाजपेयी सरकारने केली. त्याचा अहवाल २००६ साली आला. त्यानंतर आठ वर्षे युपीए सरकारने काहीही केले नाही. उत्पादनखर्चावर ५० टक्के नफा शेतकºयाला मिळाला पाहिजे हे त्याचे सूत्र आहे. आम्ही ते मान्य केले. खरीप हंगामात सर्व पिकांना त्याप्रमाणे पैसे मिळाले नाहीत हे खरे, मात्र रब्बी हंगामात असे होणार नाही. देशात विविध क्षेत्रातील विकासाबरोबर रोजगार व नोकºयांची संख्याही वाढते आहे. नवे राष्ट्रीय महामार्ग दररोज २८ कि.मी. वेगाने तयार होत असतील तर नोकºयांमध्येही चारपटीने वाढ होते आहे. संघटित क्षेत्रात, माहिती तंत्रज्ञानात नोकºयांची संख्या वाढली आहे. पर्यटन क्षेत्रात १४ टक्के, हवाई वाहतूक क्षेत्रात १६ टक्के दराने नोकºया व रोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. मुद्रा बँकेने १२ कोटी लोकांना कर्ज दिले त्यामुळे नव्या रोजगारांमध्ये भर पडली हे नाकारता येईल काय? स्वाभिमानाने रोजगार मिळवणाºयाला चायवाला व पकोडेवाला असे हिणवणे सोपे आहे मात्र ज्यांना सरकारी योजनांचा लाभ झाला, त्यांचे म्हणणे काय ते देखील समजावून घेतले पाहिजे.प्रश्न :नरेंद्र मोदी अजूनही लोकप्रिय आहेत असे आपणास वाटते काय? २०१९ साली पूर्वी इतकेच बहुमत भाजपला मिळेल याची तुम्हाला खात्री वाटते काय?उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. जनतेला त्यांच्याविषयी अतोनात प्रेम वाटते कारण त्यांनी गरिबी पाहिली. इमानदारीने गरिबांसाठी काम केले. मोदी सरकारने विविध आघाड्यांवर भरपूर काम केले.वचन दिल्यानुसार २२ कोटी कुटुंबाना काहीना काही दिले. पूर्वीपेक्षा आमच्या जागा वाढलेल्या दिसतील, पंतप्रधान पदासाठी आमचे दावेदार नरेंद्र मोदीच आहेत व त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत.प्रश्न :भाजपला २०१९ साली २०० ते २२० जागा मिळाल्या तर आपला नेता कोण असेल?उत्तर : कल्पनेच्या आधारे तयार केलेल्या प्रश्नांना मी आज उत्तर देणार नाही. २०१९ चे निकाल लागतील तेव्हा तुम्हीही असाल, मीही असेन. त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर ठामपणे मी देईन.मुलाखत : सौरभ शर्माशब्दांकन : एस.के.गुप्ता 

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरPoliticsराजकारण