लोकमत न्यूज नेटवर्ककेंद्र सरकारने बुधवारी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. त्यानुसार ६० वर्षे वयावरील लोकांना १ मार्चपासून लस घेता येईल. तर ४५ वर्षे वयावरील परंतु ज्यांना शारीरिक व्याधी असतील अशांनाही लस घेता येणार आहे. लसीकरणासाठी ३० हजार केंद्रांची उभारणी केली जाणार असून त्यापैकी १० हजार केंद्रांत लस मोफत दिली जाणार आहे. खासगी आरोग्य केंद्रे व रुग्णालयांत लसीसीठी शुल्क आकारले जाणार आहे. परंतु लसीकरणासाठी नोंदणी कशी आणि कुठे करायची, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पाहू या काय आहे ही प्रक्रिया...
लसीकरणासाठी काय करावे लागेल?लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात स्वनोंदणी पद्धत असेल लाभार्थ्याला को-विन ॲप २.० डाऊनलोड करावे लागेलया ॲपवरून लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकेल
नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे?n आधार कार्डn मतदार ओळखपत्रवयाची खात्री झाली की मगच को-विन ॲपवर अन्य माहिती दिसू शकेल
मतदार ओळखपत्र जुने आहे?त्यात वय ५०पेक्षा कमी असल्याचे दर्शवत असेल तर काय करावे?n यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील.n मतदारयादीतील तुमच्या नोंदणीनुसार तुमच्या वयाची पडताळणी केली जाईल.n जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर वय अपडेट केले जाईल.
लसीकरणासाठी तारीख आणि वेळ यांची निश्चिती करण्याचे अधिकार असतील का?होय, को-विन ॲपवर तुम्ही अपलोड केलेला डेटा आणि वय हे सर्व जुळले की ॲपवर लसीकरण केंद्राची नावे आणि स्थळ पाहायला मिळेल.आपण कोणत्या स्थळी लस घ्यावी याची निवड लाभार्थ्याला करता येईल.कोणत्या तारखेला लस घ्यायची हे ठरविण्याचे अधिकारही लाभार्थ्याला.
अन्य राज्यातील मतदार ओळखपत्र असेल तर काय?देशातील कोणत्याही राज्यात लस घेण्याचे स्वातंत्र्य सरकारने लाभार्थ्यांना दिले आहेमूळ उत्तर प्रदेशातील निवासी असलेला लाभार्थी महाराष्ट्रात लस घेऊ शकेल.
‘इतर व्याधी असलेले लोक’ या श्रेणीत कोणाचा समावेश असेल?n यासंदर्भात अद्याप केंद्र सरकारकडून ठोस अशी घोषणा झालेली नाहीn परंतु ढोबळमानाने कर्करोग, किडनीचे विकार, हृदयविकार, मधुमेह आणि हायपरटेन्शन हे आजार असलेल्यांचा या श्रेणीत समावेश असेलसंकलन : विनय उपासनी, ग्राफिक्स : नागेश बैताडिया