नवी दिल्ली : १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले कोरोना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन ॲपवर नावनोंदणी करू शकतील, असे या ॲपचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले.
या मुलांना ३ जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात होईल. कोविन ॲपवर नावनोंदणी करणाऱ्याने यापूर्वी नऊ ओळखपत्रांपैकी एखादे ओळखपत्र सादर करायचे होते. पण, आता त्यात शाळा, महाविद्यालयाच्या ओळखपत्राचाही समावेश करण्यात आला आहे. कोव्हॅक्सिनला परवानगी ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे चिंता वाढली असून, त्या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे.
झायडस कॅडिलाने तयार केलेल्या तीन डोसच्या लसीचा प्रौढ व्यक्ती व १२ वर्षांवरील मुलांकरिता आपत्कालीन वापर करण्यासाठी याआधीच औषध महानियंत्रकांनी संमती दिली होती.