१३ दिवसात साडे तीन हजार वाहनांची नोंदणी
By admin | Published: November 07, 2016 10:51 PM
जळगाव: दिवाळीच्या काळात जिल्ात वाहन बाजारात कमालीची तेजी आली. मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनाची खरेदी झाली. २४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या १३ दिवसात ३ हजार १६९ दुचाकी तर १८७ कार अशा ३ हजार ३५६ वाहनांची नोंदणी आरटीओकडे झाली. त्यातून ३ कोटी ७ लाख २१ हजार ३०७ रुपयांचा महसूल शासनाला मिळाला.
जळगाव: दिवाळीच्या काळात जिल्ात वाहन बाजारात कमालीची तेजी आली. मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनाची खरेदी झाली. २४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या १३ दिवसात ३ हजार १६९ दुचाकी तर १८७ कार अशा ३ हजार ३५६ वाहनांची नोंदणी आरटीओकडे झाली. त्यातून ३ कोटी ७ लाख २१ हजार ३०७ रुपयांचा महसूल शासनाला मिळाला.दिवाळीच्या काळात हजारो वाहने खरेदी झाली आहेत, त्याची नोंदणी अद्याप सुरुच आहे. दुचाकी घेणार्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. वाहन नोंदणी, कर व अन्य कारवाईच्या माध्यमातून शासनाला जास्तीचा महसूल मिळवून देणार्या मोठ्या विभागात आरटीओचा क्रमांक लागतो. सणासुदीच्या काळात ग्राहकांची गैरसोय होवू नये यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते.दसर्यात २ कोटी ३६ लाखाचा महसूलदसरा सणाच्या कालावधीत ३ ते १७ ऑक्टोबर या १४ दिवसात आरटीओकडे २ हजार १५२ दुचाकी तर १७९ कार अशा एकुण २ हजार ३३० वाहनांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीतून आरटीओला तब्बल २ कोटी ३६ लाख ८५ हजार ७६६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दिवाळीत त्याही पेक्षा वाहन बाजार तेजीत होता, त्यामुळे महसूलमध्येही वाढ झाली आहे.दिवाळी, दसरा, अक्षय तृतिया या सारख्या सणांचा मुहूर्त पाहून घरे, वाहने, इलेक्ट्रानिक्स वस्तूसह नवीन वस्तू खरेदी केली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या सणांच्या दिवसात वेगवेगळ्या ऑफरही देण्यात येतात. घटनास्थापना ते दसरा या नवत्रोत्सवात जिल्ात मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी झाली. कोट... दसरा व दिवाळी या दोन्ही सणांच्या दिवसात वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. त्याच्या नोंदणीतून आरटीओला कोट्यावधी रुपयाचा महसूल मिळाला आहे. काही जणांनी वाहने खरेदी केली, मात्र त्याची नोंदणी अद्याप झालेली नाही.-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाहन संख्या महसूल दुचाकी : ३१६९ १ कोटी ४५ लाख ९८ हजार ४००कार : १८७ १ कोटी ६१लाख २२ हजार ९०७एकुण : ३ कोटी ७ लाख २१ हजार ३०७