नवी दिल्ली - आज 71 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशभरातून वाहण्यात आली. मात्र हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी विकृतीचा कळस गाठत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तसेच या पुतळयाचे दहन केले. हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातील अलीगड येथे घडला. अलीगड येथे हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. यावेळी हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय हिने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर पिस्तुलामधून गोळ्या झाडल्या. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केला. तसेच मिठाई वाटण्यात आली. महात्मा नथुराम गोडसे अमर रहेच्या घोषणाही दिल्या गेल्या. ''महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे योग्य नाही. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.''असे संतापजनक वक्तव्यही पूजा शकून पांडेय हिने केले. दरम्यान, या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच विविध विचारवंतांसह, सर्वसामान्यांकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
संतापजनक! हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 8:38 PM
आज 71 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशभरातून वाहण्यात आली. मात्र हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी विकृतीचा कळस गाठत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या.
ठळक मुद्दे हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी विकृतीचा कळस गाठत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्याउत्तर प्रदेशातील अलीगड येथील प्रकारमहात्मा नथुराम गोडसे अमर रहेच्या दिल्या घोषणा