शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

संतापजनक! काश्मीरमध्ये शहीद जवानाच्या अंत्ययात्रेवरही दगडफेक

By admin | Published: May 10, 2017 7:41 PM

जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांनी आता मर्यादा ओलांडण्यास सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांनी आता मर्यादा ओलांडण्यास सुरुवात केली आहे.  आज दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केलेले लष्कराचे अधिकारी उमर फयाज यांच्या अंत्ययात्रेवर फुटीरतावाद्यांनी  दगडफेक केली. दहशवाद्यांच्या निर्घृण कृत्यात शहीद झालेल्या फयाज यांना आज पूर्ण सरकारी इतमामात सुपूर्द ए खाक करण्यात आले. 
 
यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले आहे. कुलगाम येथील रहिवासी असलेले फयाज सध्या सुटीवर होते. ते आपल्या काकांच्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बातापूरा भागात गेले होते. तेथे मंगळवारी रात्री 10च्या सुमारास दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. आज सकाळी त्यांचा गोळ्यांनी छिन्नविछिन्न केलेला मृतदेह सापडला होता. दरम्यान, काश्मीरमधील या घटनेनंतर लष्कराने सुटीवर गेलेल्या जवानांना अलर्ट केले आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी फयाज यांचे अपहरण करून त्यांना एका बागेत घेऊन गेले. तेथे त्यांना पाच गोळ्या मारण्यात आल्या. दरम्यान सकाळी फयाज यांचा मृतदेह एका स्थानिक रहिवाशाला मिळाला. त्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली.  
 
शोपियन जिल्ह्यातील गावांमध्ये सध्या मोठया प्रमाणावर दहशतवादविरोधी मोहिम राबवली जात आहे. शोपियनमध्ये जवानांवर झालेले हल्ले आणि अनेक दहशतवादी मोकाट फिरत असल्याचे व्हिडीओमधून समोर आल्यानंतर लष्कराने शोपियनमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली आहे.