ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर देण्यास नकार दिल्याने आपल्या आजारी नवऱ्याला फरफटत वॉर्डमध्ये नेण्याची वेळ एका महिलेवर आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, प्राप्त माहितीनुसार ही घटना आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.
आपल्या पायाला संसर्ग झाल्याने आजारी असलेल्या व्य़क्तीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदर व्यक्तीला दुसऱ्या वॉर्डमध्ये नेण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांना नेण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर उपलब्ध करून दिले नाही. अखेर खूप प्रयत्न करूनही स्ट्रेचर न मिळाल्याने या रुग्णाची पत्नी त्याला हाताने ओढत दुसऱ्या वॉर्डमध्ये घेऊन गेली. यादरम्यान, तेथे उपस्थित असलेल्यांपैकी कुणीही तिच्या मदतीला आला नाही. तर एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केला. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून आजारी पतीला नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले नाही. असा आरोप केला.