मार्जीनस्पेसमधील लोखंडी जिने करणार नियमित मनपा : अवैध नळकनेक्शनधारकांसाठी अभय योजना
By admin | Published: April 08, 2016 12:02 AM
जळगाव : मनपातर्फे नागरिकांनी मार्जीनस्पेसमध्ये अनधिकृतपणे बांधलेले लोखंडी जिने प्रिमियम आकारून नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी नगररचनाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौर नितीन ला यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिले.
जळगाव : मनपातर्फे नागरिकांनी मार्जीनस्पेसमध्ये अनधिकृतपणे बांधलेले लोखंडी जिने प्रिमियम आकारून नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी नगररचनाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौर नितीन ला यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिले. करांच्या वसुलीसाठी महापौरांनी उपायुक्त प्रदीप जगताप, नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम, सर्व प्रभाग अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तसेच अवैध नळकनेक्शन कायम करण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या कालावधित दंड माफ करून केवळ नळकनेक्शनसाठीचे पैसे भरून कनेक्शन नियमित करून देण्यात येणार आहे. अशाच प्रकारे खुला भूखंड कराच्या वसुलीसाठीही अभय योजना राबविली जाणार आहे. मोबाईल टॉवरच्या वसुलीसाठी विधी सल्लागार व नगररचना सहायक संचालकांनी अभ्यास करून ३० एप्रिलपर्यंत अहवाल द्यावा. त्यानुसार योग्य आकारणी या मोबाईल टॉवर्सवर करून मुदत दिली जाईल. या मुदतीत संबंधित कराचा भरणा न केल्यास टॉवर सील केले जाणार आहेत.