नवी दिल्ली : पीएनबीमध्ये केलेल्या ११,४00 कोटी रुपयांच्या घोटाळ्यास बँकेच्या ढिसाळ व्यवस्थापनाप्रमाणेच नियामक व आॅडिटर्स जबाबदार आहेत, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले. घोटाळेखोरांना शिक्षा करण्यासाठी कायदे अधिक कडक करू, असेही ते म्हणाले.जागतिक शिखर परिषदेत जेटली म्हणाले की, हा घोटाळा होत असताना, एकही धोक्याचा इशारा मिळाला नाही, ही चिंतेची बाब आहे. बँकेचे व्यवस्थापन उदासीन वा अनभिज्ञ होते, हीसुद्धा चिंतेची बाब आहे. कोणी काय केले, हे तपासात यथावकाश समोर येईलच.अनिता सिंघवींनी सादर केले उत्तरनीरव मोदी यांच्या स्टोअर्समधून खरेदी केलेल्या दागिन्यांबाबत प्राप्तिकर विभागाच्या नोटीसला अनिता सिंघवी यांनी उत्तर दिले आहे. अनिता या काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्या पत्नीआहेत.अनिता सिंघवी यांच्यातर्फे काल उत्तर देण्यात आले. खरेदी केलेल्या दागिन्यांची किती रक्कम रोखीने व किती धनादेशाद्वारे दिली, ही माहिती प्राप्तिकर विभागाने मागितली होती.आणखी खाती गोठविलीप्राप्तिकर विभागाने गीतांजली जेम्सची आणखी१४४ खाती व मुदत ठेवी गोठविल्या आहेत.या खात्यांत २0.२६ कोटी रुपये आहेत. विक्रम कोठारीच्या रोटोमॅक पेन्स कंपनीचीही खाती गोठविली आहेत. कोठारी पिता-पुत्रांना ११ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.कार्ड डाटा फुटल्याचा पीएनबीकडून इन्कारपीएनबीच्या १0 हजार ग्राहकांच्या डेबिट व क्रेडिट कार्डांचा डाटा फुटल्याचा क्लाउडसेक संस्थेने केलेला दावा पीएनबीने फेटाळून लावला आहे.बँकेची पायाभूत सुरक्षा व्यवस्था मजबूत असून, ग्राहकांच्या डाटाची सुरक्षा करण्यासाठी सर्व आवश्यक तंत्रज्ञानात्मक पावले उचलली आहेत, असे बँकेने शेअर बाजारात सादर केलेल्या दस्तावेजात म्हटले आहे. मोदी घोटाळ्याच्या तपासासाठी प्राइसवॉटर्सकूपर्सची नेमणूक केल्याचे वृत्तही बँकेने फेटाळले आहे.
घोटाळ्यांस नियामक, आॅडिटर्स जबाबदार - अरुण जेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:15 AM