मुजफ्फरनगर : काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात सीमेवर गस्त घालणाऱ्या नरेंद्र सिंग या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाची हत्या करून त्याचा गळा चिरण्याच्या अमानुष घटनेचा बदला घेण्यासाठी भारताने काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध सीमापार जोरदार कारवाई केल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शुक्रवारी येथे दिले.
पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या दुसºया वर्धापनदिनी शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर राजनाथ संग बोलत होते. नरेंद्र सिंग या जवानाच्या हौतात्म्याचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘कुछ हुआ हैं, मै बताऊंगा नही. ठीक ठाक हुआ हैं. विश्वास रखना दो-तीन दिन पहले ठीक ठाक हुआ हैं. और आगे भी देखिएगा, क्या होगा?’
राजनाथसिंग असेही म्हणाले की, पाकिस्तान शेजारी देश असल्याने त्यांच्यावर तुम्ही प्रथम बंदूक चालवू नका; पण सीमेच्या पलीकडून गोळीबार झाला, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर द्या व त्यावेळी किती गोळ्या झाडल्या याचा हिशेब करू नका, असे मी ‘बीएसफ’ला सांगितले आहे. गेल्या आठवड्यातील या घटनेनंतर पाकिस्तानला नेमकी कशी अद्दल घडविली, हे गृहमंत्र्यांनी गुलदस्त्यात ठेवले.‘बीएसएफ’चे गस्ती पथक १८ सप्टेंबर रोजी रामगढ भागात सीमेवर वाढलेले गवत कापण्यासाठी गेले असता त्यांच्यावर सीमेपलीकडून अनाठायी गोळीबार केला गेला होता. जखमी झालेल्या नरेंद्र सिंग या जवानास फरपटत सीमेच्या पलीकडे नेण्यात आले. त्याचा मृतदेह दुसºया दिवशी सापडला तेव्हा त्याच्या छातीत तीन गोळ्या घुसल्याचे व त्याचा गळा तीक्ष्ण हत्याराने चिरण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. (वृत्तसंस्था)जशास तसे उत्तरच्‘बीएसएफ’च्या सूत्रांनी सांगितले की, भारताने लगेच तोफांचा सीमापार जोरदार भडिमार केला व त्यात पाकिस्तानची मोठी प्राणहानी झाली. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनीही सीमेवर अशी काही कारवाई होऊ घातली असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले होेते.च्पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले होते की, पाकिस्तानला पुन्हा एकदा जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे.