त्रिपुरा - बलात्काराच्या गुन्हात न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर , एका आमदाराने आरोप करणाऱ्या पीडितेसोबतच लग्न केल्याची घटना, त्रिपुरात घडली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आमदार जामीन मिळावा म्हणून, त्रिपुरा उच्च न्यायालयात गेला होता. मात्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, त्याने ८ दिवसांतच पीडितेसोबत लग्न केले.
त्रिपुरातील सत्ताधारी असलेल्या 'आयपीएफटी' पक्षाच्या एका आमदारावर २० मे रोजी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी संबधीत आमदारावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आमदार फरार झाला होता. त्यानंतर या आमदाराने अटकपूर्व जामिनीसाठी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. मात्र त्रिपुरा उच्च न्यायालयाने १ जून रोजी हा जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन मिळत नसल्याने ह्या आमदाराने आरोप करणाऱ्या पीडितेसोबतच अगरतला येथील चतुर्दास देवता मंदिरात लग्न लावले.
या लग्नसमारंभला दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तसेच यापुढे एकमेकांवर कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसात दिली जाणार नसल्याचे निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला. तेसच लग्नाची कायदेशीर नोंदणीसाठी मंगळवारी कागदपत्रांची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती, आमदाराराचे वकील अमित देबबर्मा यांनी दिली आहे.