भुवनेश्वर (ओडिशा): "पाकिस्तानशी व्यवहार करताना काँग्रेसने अनेकदा राष्ट्रीय हिताला धक्का लावला," असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतील फायद्यासाठी पाकिस्तानी नेत्यांकडून समर्थन मिळवल्याचा आरोप काँग्रेसवर केला.
पंतप्रधानांनी २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. "पाक काँग्रेसच्या युवराजांना समर्थन देत भारताच्या निवडणुकीत हस्तक्षेप करत आहेत," असा आरोप मोदींनी केला. नोकरीच्या आघाडीवर सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड सर्वोत्तम आहे, असे ते म्हणाले.अदानी-अंबानींविषयीची टिप्पणी चौधरींना मान्यमाझी अदानी-अंबानी टिपणी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मान्य केली. चौधरी यांनी कबूल केले होते की, अदानी-अंबानींनी पैसे पाठवल्यास त्यांच्या विरोधात बोलणार नाही, असा दावा मोदींनी केला.
मोदी म्हणाले...भाजप कधीच अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही. काँग्रेस, इंडिया आघाडीचे कार्यकर्तेही त्यांना मतदान करत नाहीत आमच्या सरकारने जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याचे गंभीर वचन दिले आहे आणि त्यावर आम्ही कायम आहोत.