बांधकामाबाबतच्या अटी शिथिल करा
By admin | Published: May 28, 2015 11:58 PM
पुणे : संरक्षण आणि हवाई विभागाच्या हद्दीच्या सीमेपासून १०० मीटर अंतरापयंर्त बांधकाम करण्यास मनाई करण्यात आल्याने नागपूर चाळ येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्डमधील घरे, म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात अडचण निर्माण झाली आहे. याबाबत रिपब्लिकन पक्षाच्यावतीने गुरूवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे अट शिथील करण्याची मागणी करण्यात आली.
पुणे : संरक्षण आणि हवाई विभागाच्या हद्दीच्या सीमेपासून १०० मीटर अंतरापयंर्त बांधकाम करण्यास मनाई करण्यात आल्याने नागपूर चाळ येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्डमधील घरे, म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात अडचण निर्माण झाली आहे. याबाबत रिपब्लिकन पक्षाच्यावतीने गुरूवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे अट शिथील करण्याची मागणी करण्यात आली.हवाई मंत्रायलय आणि संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीलगत शहरातील अनेक नागरिकांच्या वसाहतींचा विकास करण्यात अडथळा येत असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव सहभागी होते.जिल्हाधिकारी कार्यालयाने सन २००८ मध्ये हवाई विभागाच्या हद्दीच्या सीमेपासून १०० मीटरपयंर्त बांधकाम, अतिक्रमण व वृक्ष लागवड करण्यात येऊ नये असा आदेश काढला आहे. या आदेशामुळे महाराष्ट्र हौंसिंग बोर्ड येथील ३५ वर्षे जुन्या असलेल्या घरांचा पुनर्विकास करता येत नाही.तसेच घोरपडी येथे रेल्वे ओव्हर ब्रीज उभारण्यामध्ये संरक्षण विभागाची जागा असल्याने अडथळा येत आहे. त्यामुळे बांधकामासंबंधीचे आदेश आणि अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी रिपाईच्या शिष्टमंडळाने पर्रीकर यांच्याकडे केल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.-------------