ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 22 - अफ्रिकेच्या किनारपट्टीवर समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या 10 भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली आहे. नायजेरियन नौदलाच्या मदतीने हे बचावकार्य करण्यात आलं. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
अफ्रिकेच्या आयव्होरी किनारपट्टीवर शनिवारी समुद्री चाच्यांनी मॅक्सिमस या जहाजाचं अपहरण केलं होतं. 10 भारतीय खलाशांची जरी सुटका करण्यात आलेली असली, तरीही एक भारतीय आणि पाकिस्तानी खलाशी अजूनही त्यांच्या तावडीत आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.
अफ्रिकेच्या आयव्होरी किनारपट्टीवर नेहमीच अपहरण, लुटण्याच्या घटना होत असतात. समुद्री चाचे अनेकदा जहाजांवर हल्ले करुन त्यातील माल काळ्या बाजारात विकण्यासाठी लुटून घेऊन जातात.
We have rescued 10 Indians with the help of Nigerian Navy. We are trying to rescue 11th Indian and a Pakistani crew member from the pirates.— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) February 21, 2016