शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

सोने कारागिरीतील अल्पवयीन कामगारांची सुटका * गुन्हे शाखेची कारवाई : दोघा जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM

पुणे : सोने वितळवून दागिने बनवण्याच्या तसेच दागिन्यांवर नक्षीकाम करण्याच्या कामाला जुंपलेल्या तीन बालकांची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि कामगार आयुक्तालयाच्या अधिका-यांनी संयुक्तपणे छापा टाकून रविवार पेठेत बुधवारी ही कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली.

पुणे : सोने वितळवून दागिने बनवण्याच्या तसेच दागिन्यांवर नक्षीकाम करण्याच्या कामाला जुंपलेल्या तीन बालकांची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि कामगार आयुक्तालयाच्या अधिका-यांनी संयुक्तपणे छापा टाकून रविवार पेठेत बुधवारी ही कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली.
मोरसलीम जलाल मंडल (वय 33, रा. 743, प्रचित प्लाझा, रविवार पेठ), राजू भवानी दास (वय 31, रा. 85, रास्ता पेठ पॉवर हाऊसजवळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मंडल हा मुळचा पश्चिम बंगालमधील खडसराई येथील राहणार आहे. आरोपींविरुद्ध बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 च्या कलम 3 व 14 तसेच बाल न्याय अधिनियम च्या सन 2000 चे कलम 23 व 16, भादवि 370 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस फौजदार रमेश काळे यांना खब-यामार्फत माहिती मिळाली होती.
प्रचित प्लाझामध्ये दुस-या मजल्यावर लहान मुलांकडून सोने वितळवून दागिने बनवून घेण्याचे काम करवून घेतले जात असल्याची माहिती मिळताच निरीक्षक वाघचवरे, सहायक निरीक्षक निता मिसाळ, शितल भालेकर, दिपक सप्रे, रमेश काळे, गणेश जगताप, शशिकांत शिंदे, सुरेश विधाते, रमेश लोहकरे, संदीप होळकर, राजेश उंबरे, नितीन तेलंगे, नितीन लोंढे, सचिन कोकरे, सचिन शिंदे, जयश्री जाधव, ननीता येळे, दमयंती जगदाळे, कविता नलावडे, अनुराधा ठोंबरे, प्रगती नाईकनवरे यांनी छापा टाकला.
याठिकाणाहून तीन अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली असून त्यांना संरक्षण गृहामध्ये पाठवण्यात आले आहे. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.