रिलायन्स जिओने भारतात स्वदेशी 5जी टेक्नॉलॉजी लाँच करण्याची तयारी केली आहे. देशात 4 जी सर्वप्रथम लाँच करून रिलायन्सने मोठमोठ्या कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढली आहे. 4जी साठी मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. आता असाच काहीसा प्रकार 5जी च्या बाबतीतही होणार आहे. कारण रिलायन्सने 5जीच्या ट्रायलसाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये खास स्पेक्ट्रमची मागणी केली आहे.
अमेरिकेतील कंपनी रेडिसिसने परदेशी कंपन्यांना 5G तंत्रज्ञान विकण्यास सुरुवात केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स जिओने दिल्ली आणि मुंबईमध्ये 5जी ची ट्रायल घेण्यासाठी दूरसंचार विभागाला 17 जुलै रोजी स्पेक्ट्रमसाठी मागणी नोंदविली आहे. कंपनीने 26 गीगाहर्ट्ज आणि 24 गीगाहर्ट्जच्या बँडमध्ये 800 मेगाहर्ट्ज फ्रीक्वेंसी तसेच 3.5 गीगाहर्ट्जच्या बँडमध्ये 100 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमची मागणी केली आहे.
सुत्रांनुसार जिओने म्हटले आहे की, अमेरिका, द. कोरिया, जपान, कॅनडा आणि ब्रिटेनसारख्या देशआंमध्ये उच्च फ्रिक्वेन्सीचा वापर केला जात आहे. भारतालाही आत्मनिर्भर बनविण्यासाठी या बँडची ट्रायल सुरु केली जावी. सरकारही सल्ला आणि ट्रायलासाठी तयार आहे. आधीपासूनच काही ट्रायल सुरु आहेत.
जिओने 26.5-29.5 गीगाहर्ट्ज आणि 24.25-27.5 गीगाहर्ट्ज बँडसाठी मागणी केली आहे. या स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांची संस्था इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन यूनियनने गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये 26 गीगाहर्ट्जच्या 5जी स्पेक्ट्रमला परवानगी दिली होती. तर दुसऱ्या बँडसाठी अद्याप मानके ठरविण्यात आलेली नाहीत.
अमेरिकेची कंपनी क्वालकॉम व्हेंचर्सने रिलायन्स जिओमध्ये 730 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. यामुळे रिलायन्सला 5जी साठी पुढे पाऊल टाकण्यास मदत मिळणार आहे. कारण या कंपनीकडे 5 जी टेकनॉलॉजीची यंत्रणा आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
4-5 लोकांकडेच बॉलिवूडचा कंट्रोल; गोविंदाने केले गंभीर आरोप
कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार
लेखी परीक्षा नाही! उच्च न्यायालयात नोकरीची संधी; क्लार्क पदासाठी 102 जागांवर भरती
...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान
भारत vs चिनी 'राफेल'! सामना रंगला; पहा कोण जादा शक्तीवान?
Sarkari Nokari : थेट सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने काढली पोलिसांची बंपर भरती