ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 -रिलायन्स जिओपाठोपाठ रिलायन्स कंपनी लवकरच मोफत कॉलिंग असलेला फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे हा एलटीई वाल्ट फिचर असलेल्या फोनची किंमत 1500 रुपयांच्या आत असणार आहे. सप्टेंबरमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनं 4 जीबी मोफत डेटाची ऑफर जाहीर केली आणि त्यावरही ग्राहक तुफान तुटून पडले होते. आता रिलायन्सनं जिओची हीच ऑफर ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी तीन महिने म्हणजेच मार्चपर्यंत वाढवून दिली आहे. रिलायन्स जिओनं हा फोन लाँच केल्यास त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित होऊन ओढले जाणार आहेत. कंपनी 999 ते 1500 रुपयांदरम्यान हा फोन लाँच करण्याची शक्यता आहे, असं जाणकारांचं मत आहे. अशा प्रकारचा फोन 2001मध्ये रिलायन्सनं लाँच केला होता आणि ग्राहकांच्या त्याच्यावर उड्या पडल्या होत्या. दरम्यान, भारतात जवळपास 65 टक्के लोकांकडे 1 बिलियनहून अधिक मोबाईल फोन असल्याची माहिती विश्लेषकांनी दिली आहे. सर्वात स्वस्त 4जी फोन हा 3000 रुपयांत सध्या बाजारात उपलब्ध आहे. रिलायन्स जिओच्या या वॉल्ट फिचर असलेल्या या मोबाईल फोनमध्ये फ्रंट कॅमेरा असून, मोठ्या प्रमाणात अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. या फोनमध्ये जिओ चॅट, लाइव्ह टीव्ही आणि व्हिडीओ सारखे फिचर मिळण्याची शक्यता आहे. कंपनी या फोनमध्ये डिजिटल वॉलेट सुविधा, जिओ मनी वॉलेट सुविधाही उपलब्ध करून देणार असल्याचीही चर्चा आहे. अॅप्लिकेशनयुक्त असलेला या फोनची किंमत इतर 4जी मोबाईलच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचंही विश्लेषकांचं म्हणणं आहे.
रिलायन्स जिओचा 1500 रुपयांचा जबरदस्त फोन लवकरच होणार लाँच
By admin | Published: January 12, 2017 1:40 PM