रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या दोन डोस असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या (coronavirus vaccine) वैद्यकीय चाचणीला परवानगी मिळाली आहे. ही एक रिकॉम्बिनंट प्रोटिन बेस़्ड लस आहे.
सबजेक्ट एक्सपर्ट कमिटीच्या (SEC) बैठकीत रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या अर्जाची समिक्षा करण्यात आली, त्यांनंतर त्यांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार रिलायन्स लाईफ सायन्सेसनं आपल्या प्रस्तावित लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी ड्रग रेग्युलेटरशी संर्क साधला होता.
पहिल्या टप्प्यातील चाचणी समोर आलेल्या माहितीनुसार फेज १ क्लिनिकल ट्रायलमधून मॅक्सिमम टॉलरेटेड डोस निर्धारित करण्याच्या उद्देशानं लसीची सुरक्षा, सहनशीलता, फार्माकोकायनेटिक्स आमि औषधांच्यांच्या क्रियेच्या मेकॅनिजमवर माहिती मिळवणं आहे. जाणकारांच्या मते टॉलरेटेड डोसची शक्ती किती आहे हे पडताळण्यासाठी सामान्यत: फेज १ चाचणी ५८ दिवसांची असते. ती पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्प्यासाठी अर्ज करता येतो.
सहा लसींना मंजुरीदेशात सर्वाधिक सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींचे डोस देण्यात येत आहेत. याशिवाय रशियाची स्पुटनिक व्ही, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडर कॅडिलाच्या लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी देण्यात आली आहे.