सासऱ्याला दिलासा
By admin | Published: August 03, 2015 10:26 PM
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हुंड्यासाठी छळाचा एफआयआर रद्द करून सासऱ्याला दिलासा दिला आहे. यशवंत तडस असे सासऱ्याचे नाव असून ते अमरावती येथील रहिवासी आहेत. फिर्यादी नलिनी यांनी पती व सासऱ्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. सुरुवातीला तिने पती नीलेशवरच विविध आरोप केले होते. त्यानंतर सासऱ्यालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ही एफआयआर रद्द करण्यासाठी सासऱ्याने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. शेखर ढेंगाळे यांनी बाजू मांडली.