Congress ( Marathi News ): लोकसभा निवडणुकीआधीच आयकर विभागाने काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. आयकर विभागने ३५०० कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस दिली होती. या दरम्यान, आता काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. 'लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचे प्राप्तिकर विभागाने सोमवारी न्यायालयात सांगितले. या प्रकरणाची सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलण्यात यावी आणि निवडणुकीनंतरच सुनावणी घेण्यात यावी, असे विभागाने न्यायालयाला सांगितले.
"...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन, भाजपवर अॅक्शन व्हायला हवी! पण..."; संजय राऊतांचा EC ला थेट सवाल
लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्हाला कोणत्याही पक्षाचा त्रास वाढवायचा नाही, असंही आयकर विभागाने न्यायालयात म्हटले आहे.यावर आता कोर्टाने पुढील सुनावणी २४ जुलै रोजी घेणार असल्याचे सांगितेले आहे. केंद्र सरकार आयकर विभागाचा वापर करून पक्षाला अस्थिर करू इच्छिते, असा आरोप यापूर्वी काँग्रेसने केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशी कारवाई जाणीवपूर्वक केली जात आहे, असंही काँग्रेसने म्हटले होते.
तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, अजूनही निवडणुका सुरू आहेत. अशा स्थितीत निवडणुकीच्या काळात कोणत्याही पक्षाला कोणतीही अडचण येऊ नये, अशी विभागाची इच्छा आहे. खरं तर, उच्च न्यायालयाच्या २०१६ च्या निर्णयाला आव्हान देत काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली होती. त्या आधारे आयकर विभाग त्याला नोटीस बजावत आहे.
आयकर विभागाच्या कारवाईवर राहुल गांधींची टीका
आयकर विभागाच्या कारवाईवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली हीत. 'देशातील लोकशाही संपली आहे. आमची खाती गोठवली गेली आहेत आणि शेकडो कोटींच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. यानंतरही देशाचे न्यायालय, निवडणूक आयोग आणि माध्यमे गप्प आहेत. सर्वजण एकत्र शो पाहत आहेत. लोकशाही नष्ट करण्याचा डाव आहे, असा आरोपही राहुल गांधींनी केला होता.