संपूर्ण देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं धुमाकुळ घातला आहे. देशातील अनेक राज्यात कोरोनाच्या लसीचा तुटवडा भासत आहे. देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. सरकारनं केलेल्या दाव्यानुसार हे इंजेक्शन सध्या स्टॉकमध्ये नाही. दरम्यान गुजरातच्या एका पक्ष कार्यालयात लोकांना रेमडेसिविर इंजेक्शन मोफत दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर विरोधी पक्षांनी भाजपच्या नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
गुजरातचे भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी दावा केला आहे की, भाजप कार्यालयात ५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना संक्रमित लोकांच्या नातेवाईकांना दिलं जात आहे. यावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. जर रेमडेसिविर स्टॉकमध्येच नाही तर भाजपच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात आली कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जर लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्राकडे आहे तर एखाद्या पक्षाच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर कसं काय मिळू शकतं? याबाबत जाब विचारला जात आहे. दरम्यान सुरतमध्ये भाजपच्या मुख्य कार्यालयात रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी लोकांनी सोशल डिंस्टेंसिंगसुद्धा पाळले नाही. गुजरातचे भाजप अध्यक्ष यांनी लोकांना पाच हजार इंजेक्शन मोफत देण्याची घोषणा केली त्यामुळे ही इंजेक्शन्स लोकांना त्यांच्या कार्यालयातून नेण्यास सांगितले होते, अशी चर्चा आहे.
कोरोनावरील उपचारांत रेमडेसिविर कितपत प्रभावी?
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी रेमडेसिविर या औषधाचा केला जात आहे. मात्र आता डब्ल्यूएचओने या औषधाच्या उपयुक्ततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अमेरिकन औषधनिर्माता कंपनी गिलिएड सायन्सच्या रेमडेसिवीर औषधाचा वापर भारतात केला जात आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार करण्यासाठी याच औषधाचा वापर केला गेला होता.
सर्दी खोकला नसेल तरीही वेळीच सावध व्हा'; समोर आली कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची गंभीर लक्षणं
मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेरिविरच्या उपयुक्ततेबाबत सांगितले की, सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये रेमडेसिवीर कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात फारसे परिणामकारक दिसून आले नाही. या औषधामुळे रुग्णाच्या संसर्गाचे दिवसही कमी झाल्याचे दिसले नाही. दरम्यान, गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यात हे औषध परिणामकारक ठरले नाही.
डब्ल्यूएचओने सांगितले की, सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये एकूण चार औषधांचे परीक्षण करण्यात आले. ही सर्व औषधे कुठल्याना कुठल्या दैशामधील कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येत आहेत. या ट्रायलमध्ये रेमडेसिविरसोबतच हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, अँटी एचआयव्ही ड्रग कॉम्बिनेशन लोपिनाविर-रिटोनविर आणि इंटरफेरॉन यांची तपासणी करण्यात आली.
नवीन टुथब्रश घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, तरच पांढरेशुभ्र राहतील दात, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
या संशोधनादरम्यान, ३० देशांमधील ११ हजारांहून अधिक वयस्कर रुग्णांवर या औषधांच्या दिसून आलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये ही औषधे बाधित रुग्णांवरील उपचारात कुठलेही सकारात्मक परिणाम देत नसल्याचे, तसेच मृत्युदरामध्येही फारसा फरक पाडत नसल्याचे समोर आले आहे.