नवी दिल्ली - कोरोना रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा पद्धतीचा वापर बंद करण्याच्या सूचविण्यात आले आहे. त्यानंतर, आता रेमडेसीवीर इंजेक्शनचाही वापर कोरोनाबाधित व्यक्तींच्या उपचारपद्धतीतून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. कोविड 19 च्या रुग्णांवर उपचार करताना रेमेडेसीवीर इंजेक्शनचा मोठा फायदा झाल्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे, लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे डॉ. डीए. राना यांनी म्हटले आहे.
डॉ. डीएस. राणा हे गंगाराम हॉस्पीटलचे प्रमुख असून प्लाझ्मा उपचारपद्धतीनंतर वगळण्यात आल्यानंतर रेमडेसीवीरबाबत त्यांनी हे विधान केलं आहे. कोविड 19 संबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR),नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीपासून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये याचा अयोग्यपद्धतीने वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी केवळ तीनच औषधे महत्त्वाची व प्रभावशाली बनून काम करत आहेत. कोरोना महामारीवरील उपायांसाठी सातत्याने नवनवीन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न वैद्यकीय यंत्रणा करत आहे. आम्ही सर्वचजण यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत, असेही राणा यांनी म्हटलंय.
प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन
प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले. प्लाझ्मा पद्धत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे आणि पुरावा यावर आधारित नाही. देशभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या सुरू असलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा काही उपयोग नाही. असे असूनही देशभरातील रुग्णालयात याचा उपयोग तर्कहीनपणे केला जात आहे.